घरCORONA UPDATELockDown: पुणे, नागपूरमधून नागरिकांचे घरी जाण्यासाठी हजारो अर्ज दाखल

LockDown: पुणे, नागपूरमधून नागरिकांचे घरी जाण्यासाठी हजारो अर्ज दाखल

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरी परतण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. पुण्यातून गावी जाण्यासाठी तब्बल ५ हजार ५०० जणांनी प्रशासनाकडे अर्ज दाखल केले असून नागपूरमधून परराज्यात जाण्यासाठी किंवा परराज्यातून नागपुरात येण्यासाठी ९ हजार ५०० जिल्हाधिकारी कार्यालयाला अर्ज दाखल केले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात जिल्हा प्रशासनाला ई-मेलद्वारे अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार कालपर्यंत साडेपाच हजार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. सध्या सर्व माहिती संकलित करण्यात येत असून अद्याप कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे शहर हे रेड झोनमध्ये असल्याने नागरिकांना गावी परतण्यासाठी अडचणी येत आहेत. नागपुरामध्येही परराज्यात जाण्यासाठी किंवा परराज्यातून नागपुरात येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ९ हजार ५०० अर्ज दाखल झाले आहेत. याचे वर्गीकरण करून मजुरांना परवानगी दिली जाणार आहे. नागपूरच्या शेलटर होममध्ये थांबलेल्या परराज्यातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरु झाली असून त्यांना डाक्टरांकडून तपासून सर्टिफिकेट दिले जात आहे.

- Advertisement -

राज्यात अडकलेल्या परप्रांतियांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे सोडली जात असून नाशिक ते भोपाळ अशी विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे. तसेच राज्यातील राज्यातही इतरत्र अडकलेल्या लोकांना आपापल्या ठिकाणी पाठवण्यासाठी प्रशासन नियोजनबद्ध प्रक्रिया करत आहे.

हेही वाचा –

IFSC मुंबईतून हलवण्याला पवारांचा विरोध, मोदींना लिहिले पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -