घरCORONA UPDATELockDown : सायन फ्लायओव्हरचे बांधकाम साहित्याअभावी ठप्प

LockDown : सायन फ्लायओव्हरचे बांधकाम साहित्याअभावी ठप्प

Subscribe

मुंबईसाठी महत्वाच्या असणाऱ्या सायन फ्लायओव्हरचे कामदेखील याच अडचणीमुळे ठप्प झाले आहे. काम सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल उपलब्ध होत नसल्यानेच सायन फ्लायओव्हरचे काम रखडले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांची गती मंदावली आहे. मुंबईसाठी महत्वाच्या असणाऱ्या सायन फ्लायओव्हरचे कामदेखील याच अडचणीमुळे ठप्प झाले आहे. काम सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल उपलब्ध होत नसल्यानेच सायन फ्लायओव्हरचे काम रखडले आहे. बहुतांश कच्चा माल राज्याबाहेरून येत असल्यानेच सायन फ्लायओव्हरचे काम बंद पडले आहे.

फ्लायओव्हरच्या कामामध्ये गर्डर सक्षम करण्यासाठी कार्बन रॅपिंगचे काम करावे लागते. हे कार्बन रॅपिंगचे मटेरियल हे मध्य प्रदेश तसेच गुजरात येथून उपलब्ध होते. पण लॉकडाऊनमुळे हे काम करणे अतिशय आव्हानात्मक झाले आहे. दोन गर्डर जोडण्यासाठी हे काम अतिशय महत्वाचे असे आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला तांत्रिक सल्ला देणाऱ्या आयआयटी मुंबईनेही कार्बन रॅपिंग केल्यानंतरच फ्लायओव्हरच्या बेअरींग बदलण्यासाठी फ्लायओव्हर लिफ्ट करण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

मुंबई कोरोनाच्या रूग्णांच्या झोनच्या वर्गीकरणात रेड झोनमध्ये आहे. म्हणूनच मुंबईतील सायन फ्लायओव्हरचे काम अतिशय आव्हानात्मक बनले आहे. या कामादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा निकष पाळतच एमएसआरडीसीला काम करावे लागत आहे. आता गुजरात आणि राजस्थानमधून हे कार्बन रॅपिंगचे मटेरिअल उपलब्ध झाल्यानंतर या कामाला पुन्हा सुरूवात होईल असे अपेक्षित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -