घरक्रीडावेटलिफ्टिंग महासंघाच्या चुकीची संजिता चानू ठरली बळी!

वेटलिफ्टिंग महासंघाच्या चुकीची संजिता चानू ठरली बळी!

Subscribe

भारताची वेटलिफ्टिंगपटू संजिता चानूच्या आरोग्य चाचणीत आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाकडून चूक झाल्याचे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने (आयडब्लूएफ) मान्य केले आहे. संजिता चुकीच्या नमुन्यामुळे ती चाचणीत दोषी आढळल्याचे जाहीर करण्यात आले होते, संजिताने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून देणारी वेटलिफ्टर संजिता चानू डोपिंग प्रकरणात दोषी मानली गेली होती. मात्र तिच्या या दोषी असण्यामागे इंटरनॅशनल वेटलिफ्टिंग फेडरेशन (आयडब्लूएफ) ची चूक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्याकडून ही चूक दोन वेगवेगळ्या युरीन सँपलमुळे झाली असल्याचे माहितीतून समोर आले आहे. याविषयी आयडब्लूएफने संजिताची माफी देखील मागितली आहे.

दोन वेगवेगळ्या युरीन सँपलमुळे झाली चूक

आयडब्लूएफने मागील वर्षी १७ नोव्हेंबरला एका स्पर्धेदरम्यान संजिताची युरीन टेस्ट घेतली होती. ज्यामध्ये ‘टेस्टोस्टेरॉन स्टेरॉईड’ नामक अनुचित घटक आढळल्याचे समोर आले होते. त्यामुळे तिच्यावर बंदी घालण्यात आली होती. याबाबत आयडब्लूएफकडून संजिताला १५ मे रोजी एक पत्र देखील पाठवले गेले होते. ज्यात त्यांनी या युरीन टेस्टच्या नमुन्याला १५९९००० हा नंबर दिला होता. मात्र, खरे तर या नमुन्याचा नंबर १५९९१७६ असा होता. ही चूक आधी आयडब्लूएफने मान्य केली नव्हती. मात्र, हे प्रकरण पंतप्रधान कार्यालयाकडे पोहोचल्यानंतर आता आयडब्लूएफने आपली चूक मान्य केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने खेळ मंत्रालयाला या प्रकरणात लक्ष घालायला सांगितले आहे. खेळ मंत्रालयाने या प्रकरणाची जबाबदारी नाडाला सोपवली.

- Advertisement -

संजिताकडून चौकशीची मागणी

संजिताने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तिने सुरुवातीपासूनच आपण निर्दोष असल्याचे म्हटले होते. त्यामुळे तिने या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीची मागणी केली. याबाबत संघटनेला तिने पत्र लिहिले. “इतक्या मोठ्या संघटनेकडून अशी चूक होऊच कशी शकते. इतक्या महत्त्वाच्या कागदपत्रांविषयी हा निष्काळजीपणा योग्य नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे”, असे तिने पत्रात लिहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -