घरCORONA UPDATEमुंबईतील लॉकडाऊन उघडण्याची भाजप मुंबई अध्यक्षांची मागणी

मुंबईतील लॉकडाऊन उघडण्याची भाजप मुंबई अध्यक्षांची मागणी

Subscribe

आता खुद्द भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्येसुद्धा लॉकडाऊन उघडण्याचा विचार व्हावा, अशी मागणी केली आहे.

राज्यासह देशात कोरोनाचे संकट असून, मुंबईमध्ये दिवसेदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्र सरकारने तर संपूर्ण देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहेत. मात्र, आता खुद्द भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्येसुद्धा लॉकडाऊन उघडण्याचा विचार व्हावा, अशी मागणी केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील लॉकडाऊन उघडण्याबरोबरच वैद्यकीय सुविधा विकसित करण्याविषयी राज्य सरकारने तत्काळ विचार करावा असे ते म्हणालेत.

यामुळे लॉकडाऊन उघडण्याची मागणी

देशातील काही अन्य राज्यांमध्ये लॉकडाऊन उघडण्याची सुरुवातही झाली आहे. मुंबईची अर्थव्यवस्था संकटात आहे, त्यामुळे मुंबईमध्येही आरोग्य सेवा सुधारणांसह त्या बळकट करण्याबरोबर लॉकडाऊन उघडण्यासंदर्भात राज्य सरकारने आपली योजना स्पष्ट करावी अशी मागणी मंगल प्रभात लोढा यांनी केली. लॉकडाऊन आणखी काही काळ राहिला, तर मुंबईतील उद्योग धंदे व व्यापार ठप्प होईल आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी समाप्त होतील तसेच आणि लॉकडाऊन उघडल्याशिवाय वैद्यकीय सुविधांचा विकाससुद्धा शक्य नाही असे ते म्हणालेत. एवढेच नाही तर लॉकडाऊन संदर्भात मुंबईच्या जनतेमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे १८ मे नंतर मुंबईमध्ये रोजगाराची स्थिती कशी असणार आहे, हे लोकांना माहिती नसल्याचे ते म्हणालेत. तसेच मुंबईमध्ये आता जर आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी भक्कम प्रयत्नांबरोबरच राज्य सरकारने लॉकडाऊन उघडले नाही, तर मुंबईसाठी‌ आगामी काळात परिस्थिती अतिशय गंभीरसुद्धा होऊ शकते याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. तसेच एका बाजूला कोरोना संक्रमित लोकांची संख्या वाढेल व दुसरीकडे वाणिज्य कामेही ठप्प होतील या भीतीमुळे लोक मोठ्या संख्येने मुंबईतून निघून जाण्याच्या तयारीत असल्याचे देखील ते म्हणालेत.

- Advertisement -

मुंबईतील संक्रमणाची स्थिती दीर्घकाळ टिकणारी

दरम्यान यावेळी केंद्र सरकारने २४ मार्चला देशामध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगत तेव्हा लॉकडाऊन झाले नसते तर देशभरात आणि मुंबईमध्येही स्थिती अतिशय भयावह झाली असती असे म्हटले. मात्र मुंबईमध्ये कोरोना संक्रमणाची जी स्थिती आहे, ती खूप दीर्घ काळ टिकणारी आहे. कारण आरोग्य सेवांना बळकटी दिल्याशिवाय परिस्थितीमध्ये सुधारणा शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -