घरमहाराष्ट्रनाशिकखाकीने दाखवली अशीही तत्परता...

खाकीने दाखवली अशीही तत्परता…

Subscribe

लोहशिंगवेतील दोन समाजांत रस्त्यावरून उद्भवलेला वाद अखेर शमला; पोलीस निरीक्षक वांजळे यांची यशस्वी मध्यस्थी

नाशिक आणि इगतपुरी तालुक्याच्या हद्दीवरील लोहशिंगवे येथील दोन समाजात अनेक दिवसांपासून वस्तीकडे जाणार्‍या रस्त्यावरून विकोपाला गेलेला वाद कायमस्वरूपी मिटला. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देविदास वांजळे आणि पोलीस मित्र माजी सैनिक अशोक मोरे यांच्या प्रसंगावधानतेमुळे दोन्ही गटांमध्ये होणार्‍या अप्रिय घटना टळल्या. दोघांनी दोन्ही गटांशी समन्वय साधून करोना संकटकाळात दाखवलेली चुणूक गावापुढे आदर्श निर्माण करणारी आहे. वाद वाढवण्यास कारणीभूत ठरलेले ग्रामसेवक उमेश चौधरी यांची गावातून बदली करण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

लोहशिंगवे हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून ह्या गावात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. मात्र, काही महिन्यांपूर्वी एका समाजाने दुसर्‍या समाजाला समस्या निर्माण होतील, जाण्यासाठी अडथळा निर्माण करण्यासाठी रस्ता अडवून ठेवला होता. याबाबत दोन्ही समाजामध्ये यापूर्वी अनेकदा शाब्दिक चकमक झाली आहे. हा ग्रामपंचायतीकडे गेल्यानंतर येथील ग्रामसेवक उमेश चौधरी यांनी कुठलीही शहानिशा न करता एका विशिष्ट समाजाची बाजू धरणारा निर्णय दिला. ग्रामसेवक उमेश चौधरी यांच्या भोंगळ आणि निष्क्रीय कामामुळे गावात जातीय तेढ निर्माण झाले यामुळे गावात अतिशय संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामस्थ जीव मुठीत धरून गावात राहत होते. आज दोन्ही समाजातील नागरिक संवेदनशील वातावरण निर्माण झाल्याने लाठ्याकाठ्या घेऊन तयारीत होते. याबाबत पोलीस मित्र तथा माजी सैनिक अशोक मोरे यांना माहिती मिळाली. त्यांनी देवळाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांचे तातडीने मार्ग काढून आमच्या गावात असे कधी घडले नाही यामुळे गावाचे नाव बदनाम होईल. असे सांगून रोखण्यासाठी विनंती केली. त्यानुसार दोन्ही समाजातील लोकांना बोलवुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे यांनी हा विषय अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हाताळून हा वाद मिटवला व ग्रामसेवक उमेश चौधरी यांना ताकीद देऊन तार-कुंपण काढावयास लावून रस्ता मोकळा करून दिला.

- Advertisement -

वरिष्ठ पोलीस निरीक्षक वांजळे, पोलीस मित्र अशोक मोरे यांनी खर्‍या अर्थाने गरीबांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यामुळे गावात होणारा जातीय तणाव आणि मोठा अनर्थ टळला. सहायक पोलीस निरीक्षक गिते, पोलीस हवालदार विशाल साळुंके, पो. कॉ. सुनील डावरे, पोलीस पाटील विमल जुंद्रे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पाटोळे यांचे याकामी विशेष सहकार्य लाभले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -