घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: अमेरिकेत गेल्या २४ तासांत ८६५ बळी, मृतांचा आकडा ९० हजारपार!

CoronaVirus: अमेरिकेत गेल्या २४ तासांत ८६५ बळी, मृतांचा आकडा ९० हजारपार!

Subscribe

अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १५ लाखांहून अधिक असून मृतांचा आकडा ९० हजार पार झाला आहे.

जगातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अमेरिका हे कोरोना विषाणूचे केंद्र झाले आहे. कोरोना विषाणूचा कहर अमेरिकेत कायम सुरूच आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत ८६५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ९० हजार ९७९वर पोहोचला आहे. एक दिवसापूर्वी अमेरिकेत कोरोनामुळे १ हजार २१८ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या तुलनेत अमेरिकेत मृतांच्या आकड्यात घट झाल्याची पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

अमेरिकेत कोरोनाचे १९ हजार ८८१ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा १५ लाखांहून अधिक झाला आहे. यापाठोपाठ रशिया, स्पेन, ब्रिटन, ब्राझील , इटली हे देश आहेत. रशियाने कोरोनाबाधितांच्या आकड्यात स्पेनला मागे टाकले आहे. रशियात कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत मृतांचा आकडा ९० हजारपार झाला असून त्यापाठोपाठ ब्रिटन आणि इटलीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचे ३४ हजार ६३६ बळी तर इटलीमध्ये ३१ हजार ९०८ बळी गेले आहेत. त्यामुळे जगातील मृतांचा आकडा ३ लाख १६ हजार ६७१वर पोहोचला आहे. तसंच जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ४८ लाख १ हजार ८७५ आहे. त्यापैकी १८ लाख ५८ हजार १६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

सर्वाधिक कोरोनाबाधित १० देश 

अमेरिका – १५ लाख २७ हजार ६६४ कोरोनाबाधित – ९० हजार ९७८ मृत्यू

रशिया – २ लाख ८१ हजार ७५२ कोरोनाबाधित – २ हजार ६३१ मृत्यू

स्पेन – २ लाख ७७ हजार ७१९ – २७ हजार ६५० मृत्यू

ब्रिटन – २ लाख ४३ हजार ६९५ कोरोनाबाधित – ३४ हजार ६३६ मृत्यू

ब्राझिल – २ लाख ४१ हजार ८० कोरोनाबाधित – १६ हजार ११८ मृत्यू

इटली – २ लाख २५ हजार ४३५ कोरोनाबाधित – ३१ हजार ९०८ मृत्यू

फ्रान्स – १ लाख ७९ हजार ५६९ कोरोनाबाधित – २८ हजार १०८ मृत्यू

जर्मनी – १ लाख ७६ हजार ६५१ कोरोनाबाधित – ८ हजार ४९ मृत्यू

तुर्की – १ लाख ४९ हजार ४३५ कोरोनाबाधित – ४ हजार १४० मृत्यू

इराण – १ लाख २० हजार १९८ कोरोनाबाधित – ६ हजार ९८८ मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -