घरCORONA UPDATELockdown 4.0 | वाचा, नवीन नियमावली आणि काय सुरु, काय बंद राहणार?

Lockdown 4.0 | वाचा, नवीन नियमावली आणि काय सुरु, काय बंद राहणार?

Subscribe

देशात आजपासून पुन्हा एकदा १४ दिवसांचा लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होत आहे.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला अटकाव करण्यासाठी भारतात २५ मार्च रोजी पहिल्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. मात्र यावेळी लॉकडाऊनमध्ये काही सुट आणि शिथिलता देखील देण्यात आली आहे. ११ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर राज्यांनी दिलेल्या सूचनेनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने यावेळी लॉकडाऊनमध्ये काही बदल केले आहेत.

गृहमंत्रालयाने यावेळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन निश्चित करण्याचे अधिकार दिले आहेत. कन्टेनमेंट झोनमध्ये केंद्राने ज्या बाबींना परवानगी दिलेली आहे, त्याच बाबी सुरु राहतील. कन्टेनमेंट झोन व्यतिरीक्त इतरत्र काय चालू आणि बंद ठेवायचे याचे अधिकार आता राज्यांना असणार आहेत.

- Advertisement -

लॉकडाऊनमध्ये यावेळी काय बंद राहणार?

– सर्व स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे बंद राहणार. फक्त मेडिकल सर्विस, एअर अॅम्बुलन्स आणि सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्रालयाची परवानगी घेऊन उड्डाणे घेता येणार आहेत.

- Advertisement -

– अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत घराबाहेर पडता येणार नाही.

– देशातील सर्व मेट्रो सेवा बंद राहणार.

– शाळा, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्था बंद राहणार

– हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर खानपान सेवा बंद राहणार

– सर्व सिनेमागृह, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, उद्याने, नाट्यगृह, बार, सभागृह किंवा सामाजिक कार्यक्रमासाठी असणाऱ्या जागा बंदच राहतील.

– सर्वच सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणुकीचे, सांस्कृतिक, धार्मिक जाहीर कार्यक्रमांना परवानगी नाही

– सर्व धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे बंद राहतील.

हे सुरु राहणार?

– आरोग्य कर्मचारी, पोलीस, सरकारी अधिकारी आणि क्वारंटाईन केलेल्यांसाठी हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी

– बस डेपो, रेल्वे स्टेशन आणि विमानतळावरील कँटिन सुरु राहिल

– खाद्य पदार्थांची होम डिलिव्हरी करण्यासाठी हॉटेलचे किचन सुरु ठेवता येईल.

– ऑनलाईन दुरस्थ अभ्यासक्रमांना परवानगी

– कन्टेनमेंट झोन वगळता आंतरराज्यीय बस सेवा सुरु करण्यास परवानगी. मात्र राज्यांची सहमती आवश्यक.

– आरोग्य कर्मचारी, पॅर मेडिकल कर्मचारी तसेच औषधांची वाहतूक करण्यासाठी आंतरराज्य वाहतुकीला विनाअडथळा परवानगी

– तसेच सर्व राज्यांमध्ये सामान, कार्गो आणि मोकळ्या ट्रकना प्रवास करण्याची मुभा

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अधिकार

– राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आता आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन निश्चित करु शकतात.

– स्थानिक जिल्हा प्रशासन किंवा महापालिका तत्सम स्थानिक स्वराज संस्था आता त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागात झोन निश्चित करु शकणार आहेत.

– कन्टेनमेंट झोनमध्ये मात्र अत्यावश्यक सेवानांच परवानगी असेल. या झोनमध्ये लोकांची गर्दी होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे.

– सलून, केशकर्तनालय, स्पा, अत्यावश्यक नसलेल्या ई वाणिज्य संस्थांना ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये राज्याच्या परवानगीनंतर कार्य सुरु करता येणार आहे.

आतापर्यंतचे लॉकडाऊनचे टप्पे

Lockdown 1.0 – २५ मार्च ते १४ एप्रिल (२१ दिवस)

Lockdown 2.0 – १५ एप्रिल ते ३ मे (१० दिवस)

Lockdown 3.0 – ४ मे ते १७ मे (१४ दिवस)

Lockdown 4.0 – १८ मे ते ३१ मे (१४ दिवस)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -