घरक्रीडाऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकायचेय

ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकायचेय

Subscribe

भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी ती भारताची पहिली महिला बॉक्सर होती. मात्र, आता पुढील वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला पदकाचा रंग बदलायचा आहे. या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचे तिचे लक्ष्य आहे. मी जेव्हाही बॉक्सिंग रिंगमध्ये असते, तेव्हा माझ्याकडून सर्वांना खूप अपेक्षा असतात. मी या अपेक्षा कशा पूर्ण करणार आणि माझ्या खेळात कशी सुधारणा करणार, या विचाराने मला बरेचदा रात्री झोप येत नाही. लोक माझ्यासाठी प्रार्थना करत असल्याने मी इतके यश मिळवू शकले आहे. मी अजूनही माझ्या खेळात सुधारणा करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेगळ्या रंगाचे पदक मिळवण्याचे माझे लक्ष्य आहे, असे मेरी म्हणाली.

पात्रता फेरीच्या तारखा निश्चित करा!

लोझान । पुढील वर्षी होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धांच्या तारखा निश्चित करा, जेणेकरून वेळेआधीच सर्व पात्रता स्पर्धांचे वेळापत्रक आखण्याकरिता मदत होईल. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील रद्द होणार्‍या स्पर्धा पुन्हा आयोजित करता येतील, अशा सूचना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) आंतरराष्ट्रीय महासंघांना केल्या आहेत. पात्रता फेरीची सुधारित पद्धत लागू करण्यात आल्यानंतर आयओसीचे क्रीडा कार्यप्रणाली व्यवस्थापक पात्रता स्पर्धांचा आराखडा आखत आहेत, असेही आयओसीकडून सांगण्यात आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यावर्षी होणार होती. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर आयओसी आणि जपानी आयोजकांना ही स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलणे भाग पडले. त्यामुळे आता ही स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत पार पडणार आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -