घरताज्या घडामोडीऊसाच्या शेतात बिबट्याचे बछडे

ऊसाच्या शेतात बिबट्याचे बछडे

Subscribe

नाशिक : पाथर्डी गावाजवळील गौळाणे रस्त्यावर कोंबडेमळ्यातील ऊसाच्या शेतात सोमवारी (दि.१) सकाळी बिबट्याचे बछडे आढळून आले. या परिसरात बिबट्याच्या मादीचा वावर आहे. ती बछड्याजवळ परतण्याची शक्यता असल्याने संरक्षण व दक्षतेसाठी वनविभागाने परिसर निगराणीखाली ठेवला आहे.

पाथर्डी गावातील कोंबडेमळ्यात नाल्याशेजारील शेतात ऊसतोडणी सुरू आहे. मजुरांना ऊसतोडणी सुरु असताना सोमवारी सकाळी बिबट्याचे बछडे नजरेस पडले. मजुरांनी लगेच शेतमालक संजय कोंबडे यांना शेतात बछडे असल्याचे सांगितले. त्यांनी तत्काळ नाशिक पश्चिम वनविभागाच्या कार्यालयाशी सकाळी ९.३० वाजेदरम्यान संपर्क साधला. त्यानुसार वनपाल मधुकर गोसावी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने बछड्यास ताब्यात घेतले. बछडा एक महिन्याचा असून तो सुदृढ आहे. य भागात बिबट मादीचा संचार असावा, असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. खबरदारी म्हणून शेतमजुरांनी संध्याकाळी घरी सुरक्षित जावे. बिबट मादी दिसल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -