घरCORONA UPDATE'इडी'चे पाच अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह; मुख्यालय केलं सील

‘इडी’चे पाच अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह; मुख्यालय केलं सील

Subscribe

अंमलबजावणी संचालनालयाच्या ५ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या ‘लोक नायक भवन’ या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर मुख्यालय सील करण्यात आलं आहे. याबाबतचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

दरम्यान, एक दिवस आधी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था कार्यालयातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तर काल ५ जूनला अंमलबजावणी संचालनालयाच्या ५ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे अंमलबजावणी संचालनालयाचं मुख्यालय सील करण्यात आलं आहे. दोन दिवस म्हणजेच उद्यापर्यंत सील करण्यात आलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबियांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

- Advertisement -

देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ

भारताने इटलीला मागे टाकलं असून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. इटलीमध्ये २ लाख ३४ हजार ५३१ कोरोनाचे रुग्ण आहेत. भारतात कोरोना रुग्णांचा आकडा २ लाख ३६ हजार ११७ वर पोहोचला आहे. त्यात १ लाख १५ हजार ९४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १ लाख १४ हजार ०७३ लोकांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. भारतात कोरोना चाचणीचा वेग वाढल्यामुळे रुग्ण संख्या देखील वेगाने वाढत आहे.


हेही वाचा – रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मातृशोक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -