घरताज्या घडामोडीपुणे : २४ तासांत आढळले १५९ नवे रुग्ण; तर ५ हजार रुग्ण...

पुणे : २४ तासांत आढळले १५९ नवे रुग्ण; तर ५ हजार रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

पुण्यात २४ तासांत १५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या ७ हजार ८८१ इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात गेल्या २४ तासांत दिवसभरात नव्याने १५१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ७ हजार ८८१ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, पिंपरी – चिंचवड शहरात नव्याने ६२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दोन महिलांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

५ हजार १९ रुग्ण कोरोनामुक्त

पुण्यात गेल्या २४ तासांत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३७८वर पोहोचली आहे. तर कोरोनावर उपचार घेणाऱ्या एकूण ८५ रुग्णांची पुन्हा तपासणी केली गेली. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी एकूण ५ हजार १९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत रविवारी बाधित आढळलेले रुग्ण हे आनंदनगर, अजंठानगर, दापोडी, काळेवाडी, पिंपरी गांव, जुनी सांगवी, पाटीलनगर चिखली, फुलेनगर, बालाजीनगर, रहाटणी, वाकड, दळवीनगर, पिंपरी स्टेशन, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, पवनानगर पुणे आणि मुंबई येथील रहिवासी आहेत.

राज्यात ३ हजार नवे रुग्ण

राज्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होत असताना रविवारी अचानक तब्बल ३००७ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८५ हजार ९७५ वर पोहोचली आली आहे. त्याचप्रमाणे ९१ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३०६० झाली आहे. राज्यातील मृत्यू दर ३.५५ टक्क्यांवर आला आहे. रविवारी राज्यातील १९२४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून आजपर्यंत ३९ हजार ३१४ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४५.७२ टक्के एवढे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – खासगी हॉस्पिटलवर महापालिकेचे ऑडिटर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -