घरCORONA UPDATEआयपीएल न झाल्यामुळे अंपायर ते चियरलिडर्सचे नुकसान

आयपीएल न झाल्यामुळे अंपायर ते चियरलिडर्सचे नुकसान

Subscribe

बोर्डलाही ४ हजार कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. लीगमध्ये सहभागी होणाऱ्यांवरही परिणाम झाला आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) सध्याचा हंगाम कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आला आहे. टी -२० वर्ल्डकप भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल आयोजन करू शकेल. यावर्षी आयपीएल न होण्याचा परिणाम मोचीपासून ते चिअरलिडर्सपर्यंत आणि इंटर नॅशनल लेव्हलला एकही मॅच न खेळलेला खेळाडू (अनकेप्ड खेळाडू)पासून पंचांपर्यंत प्रत्येकावर झाला आहे. बोर्डलाही ४ हजार कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. लीगमध्ये सहभागी होणाऱ्यांवरही परिणाम झाला आहे.

भास्करन सीएसकेचा मोची त्याच्याकडे काम नाही

भास्करन हा चेन्नई सुपर किंग्जचा ऑफिशियल मोची आहे. तो २००८ पासूनच्या फ्रँचायझीशी जोडले गेले आहेत. चिदंबरम स्टेडियमच्या बाहेर त्याचे दुकान आहे. ते दिवसाला ५०० रुपये कमवतात. सामन्यादरम्यान ते खेळाडूंचे हातमोजे, पॅड आणि शूज दुरुस्त करतात. त्यांनी सांगितले की, दररोज हजारो रुपये फ्रँचायझीकडून मिळतात, तसेच खेळाडूकडून स्वतंत्र पैसे मिळतात. परंतु लॉकडाऊनमुळे त्याचे उत्पन्न थांबले आहे.

- Advertisement -

२०० हून अधिक लोक जर्सी बनवतात

लीग दरम्यान संघांच्या जर्सी विकल्या जातात. लीगशी जोडलेले रोशन म्हणाले की, आम्ही इतरवेळी ४० जनांसोबत काम करतो. पण आयपीएलमध्ये ही संख्या २०० पर्यंत वाढवावी लागते. आमच्याकडे मागील वर्षात पाच संघांचे जर्सीच्या ऑर्डर होत्या. पण आता सर्व संघांनी ऑर्डर बंद केली आहे. यानंतर आम्ही जर्सीचे उत्पादन बंद केले आहे. गोदामात दोन कोटींचा माल पडून आहे.

१५ पेक्षा जास्त अनकैप्ड खेळाडूंना पैसे मिळणार नाहीत

डावखुरा फिरकीपटू शाहबाज अहमद, बंगालकडून खेळणारा, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने २० लाखात विकत घेतला. यावेळी, लिलावामध्ये १५ हून अधिक खेळाडूंनी ८ संघांमध्ये स्थान मिळविले. लीग नसल्यामुळे या सर्व खेळाडूंना पैसे मिळणार नाहीत.

- Advertisement -

पंचांना १५ लाख रुपये मिळतात

आयपीएलमधील प्रत्येक सिजनमध्ये १५ ते २० भारतीय पंचांना संधी मिळते. मॅच रेफरी देखील असतात. पंचांना प्रत्येक सामन्यासाठी ३० ते ४० हजार रुपये मिळतात. त्यांना सरासरी १५ लाख रुपये मिळतात. त्याचवेळी, लोकल स्कोररला प्रत्येक सामन्यात १० हजार मिळतात. तर ७ सामन्यांपैकी ७० हजार आहे.

चियरलीडर सोफिया सुपर मार्केटमध्ये काम करतेय

मुंबई इंडियन्समध्ये चियरलीडर म्हणून काम करणार्‍या ब्रिटनच्या सोफिया म्हणतात की, लीग नसल्यामुळे तिला खूप त्रास होत आहे. ऑनलाइन डान्सिंग क्लासेससह ती सुपरमार्केटमध्ये नाईट शिफ्टमध्येही काम करत आहे. एका चियरलीडरला सरासरी ११ लाख रुपये मिळतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -