घरCORONA UPDATECorona Update: देशात गेल्या २४ तासांत ३२५ जणांचा मृत्यू तर ११,५०२ कोरोनाचे...

Corona Update: देशात गेल्या २४ तासांत ३२५ जणांचा मृत्यू तर ११,५०२ कोरोनाचे नवे रुग्ण!

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. सलग पाचव्या दिवशी कोरोनाच्या मृतांची संख्या ३०० हून अधिक आहे. तसेच सलग तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या देखील ११ हजाराहून अधिक आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३२५ जणांचा मृत्यू झाला असून ११ हजार ५०२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या ९ हजार ५२०वर तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ३२ हजार ४२४वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ५३ हजार १०६ रुग्ण अॅक्टिव्ह असून १ लाख ६९ हजार ७९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

 

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७ हजार ९५८वर पोहोचली असून ३ हजार ९५० जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून एकूण बाधितांची संख्या ५८ हजार २२६ आहे. तर एकट्या मुंबईत आतापर्यंत २ हजार १८२ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्यानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यात आढळले आहे. आतापर्यंत तमिळनाडूनमध्ये ४४ हजार ६६१, दिल्लीत ४१ हजार १८२, गुजरात २३ हजार ५९० आणि उत्तर प्रदेशमध्ये १३ हजार ६१५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.


हेही वाचा – कोरोनाचा कहर! जगात रूग्णांची संख्या ८० लाखांवर, साडे चार लाख लोकांचा मृत्यू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -