घरमहाराष्ट्रसंजय राऊत देवालाही प्रश्न विचारतील

संजय राऊत देवालाही प्रश्न विचारतील

Subscribe

चंद्रकांत पाटील यांची टीका

शिवसेनेचे खासदार संजय राऊत देवालाही प्रश्न विचारतील, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मुंबईत करोनाबाधित रुग्णांना बेड नाहीत, रुग्णवाहिका नाहीत, तरीही परिस्थिती चांगली आहे, असे सरकार कसे काय म्हणत आहे, असा सवालही त्यांनी केला.

कोल्हापुरात शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपने आंदोलन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारले आहेत. ते ग्रेट संपादक आहेत. उद्या ते देवालाही प्रश्न विचारतील. करोना संसर्गामुळे भारतात जेवढे बळी गेले, त्यातील निम्मे बळी हे राज्यात गेले. सध्या देशात जेवढे करोनाबाधित आहेत, त्याच्या निम्मे बाधित हे महाराष्ट्रात आहेत. त्यांच्यावर उपचार करायला सुविधा नाहीत, बेड नाहीत, रुग्णवाहिका नाहीत, तरीही ‘राज्यात परिस्थिती चांगली आहे ’ असे जर सरकार म्हणत असतील तर ते हास्यास्पद आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही काँग्रेसचे अनेक मंत्री मंत्रिमंडळात आहेत. त्यांना मोठा अनुभव आहे. पण त्या अनुभवाचा फायदा हे ज्येष्ठ मंत्री ठाकरे यांना करून देत नसल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -