घरमहाराष्ट्ररामदेवबाबांविरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार

रामदेवबाबांविरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार

Subscribe

योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोनावर आयुर्वेदाच्या माध्यमातून १०० टक्के प्रभावी औषध शोधले असल्याच्या दावा केला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच आयुष मंत्रालयाने रामदेव बाब यांच्या औषधांवर स्थगिती आणली. मात्र आता कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करणार्‍या रामदेव बाबा यांनी नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप करत पुण्यातील वडगाव शेरी येथील आशिष माने यांनी त्यांच्याविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन आणि आयुष मंत्रालयाकडेही तक्रार केली आहे.

रामदेव बाबा यांनी कोरोनावर औषध शोधले असल्याचा दावा एका खासगी वृत्तवाहिनीवर करताना त्यांनी त्यासंदर्भातील कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. तसेच मुलाखतीमध्ये त्यांनी औषधाची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली असून, त्यासाठी 500 वैज्ञानिकांची टीम कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र या औषधाची कोणत्याही सरकारी यंत्रणांकडून खातरजमा न करताच रामदेव बाबा यांनी त्याची जाहिरात केली आहे. परंतु ही जाहिरात करताना रामदेव बाबा यांच्याकडून औषधे आणि सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० च्या कलम ३३ पी कायदा आणि औषधीद्रव्ये आणि तिलस्मी (जादूटोण्याचे) उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम १९५४ च्या कलम ७ तसेच औषधे आणि सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० च्या कलम ३३ आय आणि ३३ जे या कायद्याचे उल्लंघन केला असल्याचा आरोप करत पुण्यातील आशिष माने यांनी रामदेव बाबा यांच्याविरोधात चंदन नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अन्न व औषध प्रशासन आणि आयुष मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. संबंधित खासगी वृत्तवाहिनीनेही पुराव्यांची खातरजमा न करताच त्यांची मुलाखत प्रसिद्ध केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावी अशी विनंती पोलिसांना केली आहे.

- Advertisement -

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारत सरकारच्या आयुर्वेद, योग्य व प्राकृतिक चिकित्सा युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी (आयुष) मंत्रालयाने कोविड १९ शी संबंधित कोणत्याही उपचारांच्या दाव्यांना प्रिंट, टीव्ही आणि जाहिरात करण्यास प्रतिबंध केला आहे. असे असतानाही रामदेव बाबा यांनी त्यांच्या औषधांची जाहिरात सर्रासपणे वृत्तवाहिनीवर केली आहे.

रामदेव बाबांची पदवी तपासावी

रामदेव बाबा यांनी आपण खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपण फक्त योगाचार्य नसून, आयुर्वेदाचार्य असल्याचा दावाही केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे प्रत्यक्ष आयुर्वेदाचार्य असल्याबद्दलची पदवीची खात्री करण्यात यावी. तशी कागदपत्रे रामदेव बाबा यांच्याकडून उपलब्ध करून घ्यावीत व अशी पदवी नसल्यास खोटी माहिती दिल्याबद्दलही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही माने यांनी आपल्या तक्रारीमध्ये केली आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -