घरदेश-विदेशयेणार आणखी नवं सकंट! ८ हजार किमी अंतरावर आहे, वाळूचे वादळ!

येणार आणखी नवं सकंट! ८ हजार किमी अंतरावर आहे, वाळूचे वादळ!

Subscribe

या वाळूच्या वादळास 'सहारन डस्ट' म्हणून ओळखले जाते

कोरोना संसर्गाला सामोरे जाणाऱ्या जगाची संकट कमी होण्याचे नाव घेत नाही. कॅरेबियन देशांमध्ये बऱ्याच दिवसांपासून सूर्य दिसत नसून आता अमेरिकेतही अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे. सहारा वाळवंटातून आलेल्या वाळूने अनेक देशांच्या आकाशाला आच्छादित केले आहे. आता ते ८ हजार किलोमीटर दूर अमेरिकेच्या पोर्टो रिको आणि सॅन जुआनपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, या वाऱ्यासह वाळू वाहत असल्याने वाळूच्या नव्या वादळाचे भय व्यक्त केले जात आहे.

हे वाळूच्या वादळास ‘सहारन डस्ट’ म्हणून ओळखले जाते आणि हे सामान्य वाळूच्या वादळांसारखे नसल्याचे सांगितले जात आहे. सीएनएनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वाळूचे हे अगदी बारीक कण आहेत, जे वाऱ्यासह ३ ते ७ हजार फूट उंचीवर वाहत असतात. हे दृश्य एखाद्या ढग सारखे दिसते, परंतु प्रत्यक्षात ते सहारा वाळवंटातील धूळ आहे. कॅरिबियन देशांमध्ये गेल्या अनेक आठवड्यांपासून या धुळीने संपूर्ण आकाश व्यापले आहे. कॅरिबियन देशांमध्ये परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असा इशारा हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे.

- Advertisement -

पोर्टो रिको युनिव्हर्सिटीच्या हवामान तज्ज्ञ ओल्गा मेयोल यांनी सीएनएनशी बोलताना सांगितले की, हा एक ऐतिहासिक क्षण आहे, तो सुमारे ५० वर्षांत एकदाच दिसतो. तसेच कॅरिबियन देशांमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट स्थितीत पोहोचली असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, इतकी मोठी वाळू हजारो किलोमीटरचा प्रवास करून मध्य अमेरिकेत पोहोचेल हे आश्चर्यकारक आहे. एनईआरसी हवामानशास्त्रज्ञ क्लेयर रायडर यांनी सांगितले की, सहसा दरवर्षी असे वादळ सहारा वाळवंटातून येत असते आणि समुद्र पार केल्यावर पाऊस पडताच संपते. याचा ४ % भागच अमेरिकेपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते.

- Advertisement -

रायडरने दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिकेत वारंवार येणाऱ्या वादळामुळे या धुळीच्या वादळास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. यामुळे यंदा वाळूच्या वादळाने ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. हवेतील वाळूचे प्रमाण सामान्यपेक्षा खूपच जास्त असते, जे अत्यंत हानिकारक असल्याचे सिद्ध होऊ शकते. ते म्हणाले की, ही एक अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि लोकांनी यासाठी तयार असले पाहिजे.


चीनने नेपाळलाही दिला धोका; नेपाळचा ३३ हेक्टर भूभाग बळकावला
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -