घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटजगात २४ तासांत १.७६ लाख नवे कोरोना रुग्ण, एकूण बाधितांचा आकडा ९७...

जगात २४ तासांत १.७६ लाख नवे कोरोना रुग्ण, एकूण बाधितांचा आकडा ९७ लाख पार!

Subscribe

अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार, संपूर्ण जगात ९७ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांची संख्या चार लाख ९० हजारांहून अधिक आहे. तर ५२ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. जगात ६६ टक्के कोरोनाची प्रकरणे फक्त १० देशांमध्ये आहे. या देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाखांहून अधिक आहे.

जगात सर्वात जास्त कोरोनाचा फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित आणि मृतांचा आकडा आहे. आतापर्यंत अमेरिकेत २५ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी १ लाख ५२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पण आता अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांचा नोंद जास्त होत आहे. मागील २४ तासांत अमेरिकेत ३७ हजार ९०७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ५९५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलमध्ये ४० हजार ६७३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १ हजार १८० जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये २५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाखांवर पोहोचली आहे.

- Advertisement -

या १० देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या

अमेरिका : कोरोनाबाधित – २,५०४,५८८ – मृत्यू – १२६,७८०
ब्राझील : कोरोनाबाधित – १,२३३,१४७ – मृत्यू – ५५,०५४
रशिया : कोरोनाबाधित – ६१३,९९४ – मृत्यू – ८,६०५
भारत : कोरोनाबाधित – ४९१,१७० – मृत्यू – १५,३०८
ब्रिटन : कोरोनाबाधित – ३०७,९८० – मृत्यू – ४३,२३०
स्पेन : कोरोनाबाधित – २९४,५६६ – मृत्यू – २८,३३०
पेरू : कोरोनाबाधित – २६८,६०२ – मृत्यू – ८,७६१
चिली : कोरोनाबाधित – २५९,०६४ – मृत्यू – ४,९०३
इटली : कोरोनाबाधित- २३९,७०६ – मृत्यू – ३४,६७८
इराण : कोरोनाबाधित – २१५,०९६ – मृत्यू – १०,१३०


हेही वाचा – बिहारमध्ये वीज कोसळल्याने ८३ जण ठार, राज्य सरकारतर्फे ४ लाखांची मदत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -