घरदेश-विदेशफारुख अब्दुल्लांना अनाहुताकडून जीवे मारण्याचा प्रयत्न?

फारुख अब्दुल्लांना अनाहुताकडून जीवे मारण्याचा प्रयत्न?

Subscribe

सकाळी ९.३० च्या सुमारास एक सुस्साट गाडी फारुख अब्दुल्ला यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडकली. गेट उडवत त्यातील माणूस घराच्या आत जाण्याच्या मनसुब्यात होता.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या घरी एका सुस्साट गाडीने जबरदस्ती शिरण्याचा प्रयत्न केला.. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. पण पोलिसांनी गाडीतील माणसावर गोळ्या झाडल्या त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आता या हल्ल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांना मारण्याचा प्रयत्न तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता फारुख अब्दुल्ला यांच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

सकाळी ९.३० च्या सुमारास एक सुस्साट गाडी फारुख अब्दुल्ला यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडकली. गेट उडवत त्यातील माणूस घराच्या आत जाण्याच्या मनसुब्यात होता. गेट गाडीखाली तुडवत तो आत आला आणि तो घराच्या आत देखील गेला. तेथील सामानाचे त्याने नुकसान केले. पण तो काही अनुचित प्रकार करणार या आधीच त्याला सुरक्षा रक्षकांनी घेरले. यावेळी सुरक्षा रक्षक आणि हल्लेखोरामध्ये झटापट झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. यात सुरक्षा रक्षक अधिकारी देखील जखमी झाला.

हल्लेखोराजवळ हत्यार नव्हते

गाडीतून आलेल्या त्या हल्लेखोराची ओळख पटली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे नाव मुरफस शाह आहे. तो पुंछमधील रहिवासी आहे. त्याची अधिक तपासणी केली असता त्याच्या जवळ कोणतेही हत्यार सापडलेले नाही.

- Advertisement -

ओमार अब्दुल्लांनी केले ट्विट

फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र ओमार अब्दुल्ला यांनी या घटनेसंदर्भात ट्विट केले असून घटनेची माहिती मिळाली आहे. या संदर्भातला अधिक तपास सध्या सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -