घरलाईफस्टाईलझटपट ब्रेड पोहे रेसिपी

झटपट ब्रेड पोहे रेसिपी

Subscribe

सकाळच्या न्याहारी किंवा संध्याकाळच्या चहासह देखील हा पदार्थ खाऊ शकता

महाराष्ट्रात न्याहारीसाठी हा पदार्थ बनविला जातो. ब्रेड पोहे हा पोह्यांचा एक प्रकार आहे जो ब्रेड आणि काही मसाल्यांनी बनविला जातो. सकाळच्या न्याहारी किंवा संध्याकाळच्या चहासह देखील हा पदार्थ खाऊ शकता.

- Advertisement -

साहित्य-

२ चमचे तेल, १/८ टीस्पून हिंग, ५ ते ६ कढीपत्त्याचे पाने, २ चमचे लाल तिखट, १ वाटी वाटाणे (उकडलेले), भाजलेले शेंगदाणे, १ चमचा हळद, १ टीस्पून मीठ, ४ ब्रेडचे तुकडे, २ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून लिंबाचा रस, कोथिंबीर, किसलेले नारळ.

झटपट ब्रेड पोहे रेसिपी बनवण्याची कृती

  • कढईत थोडे तेल टाकून गरम करून घ्यावे.
  • तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, मोहरी, कढीपत्ता आणि लाल तिखट घालावे.
  • त्यात वाटाणे घालून ते शिजवून घ्यावे.
  • त्यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे घालावे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यावे.
  • हळद आणि मीठ टाकल्यानंतर ब्रेडचे तुकडे घालून ते चांगले फ्राय करावे.
  • ब्रेडचे तुकडे घातल्यानंतर त्यावर थोडे पाणी शिंपडून घ्यावे.
  • शेवटी त्यात हिरवी मिरची, लिंबाचा रस आणि हिरवी कोथिंबीर घालावी.
  • पदार्थ तयार झाल्यावर किसलेले नारळ घालून झटपट ब्रेड पोहे सर्व्ह करावे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -