घरताज्या घडामोडीदेशात २४ तासांत २२ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ४८२ जणांचा मृत्यू

देशात २४ तासांत २२ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ४८२ जणांचा मृत्यू

Subscribe

देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात २२ हजार ७५२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४८२ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात २२ हजार ७५२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४८२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४२ हजार ४१७ वर पोहोचली असून मृतांची संख्या २० हजार ६४२ झाली आहे. तसेच २ लाख ६४ हजार ९४४ active केसेस असून ४ लाख ५६ हजार ८३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

निमलष्करी दलांमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ

- Advertisement -

कोरोनाचा कहर देशभरात सुरू असून पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह आता निमलष्करी दलातील जवान देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. नुकतीच धक्कादायक माहिती समोर येत असून निमलष्करी दलांमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. ‘अमर उजाला’ने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आतापर्यंत २७ जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर त्यापैकी १८ जवानांचा मृत्यू केवळ जून महिन्यात झाला. दरम्यान, कोरोना संक्रमित कर्मचार्‍यांची संख्या ४ हजार ८०० च्या वर पोहोचली आहे. यापैकी १ हजार ९०५ active रुग्ण आहेत.


हेही वाचा – भारताच्या ‘या’ राज्यात एकही कोरोना रुग्ण नाही!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -