घरताज्या घडामोडीकरण जोहर आणि नीतू कपूरलाही कोरोना?

करण जोहर आणि नीतू कपूरलाही कोरोना?

Subscribe

एका ट्विटर युजरने रणबीर कपूर, नीतू कपूर, करण जौहर, रिद्धिमा कपूर यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट केले होते. मात्र, यावर रिद्धिमाने खुलासा केला आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विटरद्वारे दिली. त्यानंतर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन याची देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. याच दरम्यान, एका ट्विटर युजरने रणबीर कपूर, नीतू कपूर, करण जोहर, रिद्धिमा कपूर यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट केले होते. मात्र, यावर हे खोटे असल्याचे रिद्धिमाने स्क्रिनशॉट काढून स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाली रिद्धिमा कपूर?

रिद्धिमा कपूने इन्स्टाग्रामवर याबाबत खुलासा केला आहे. ‘आम्ही ठिक आहोत. अफवांना बळी पडू नका’. हे ट्विट एका अमित वरिष्ठ नावाच्या एका तरुणाने केले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, कन्फर्म रणबीर कपूर, नीतू कपूर, करण जौहर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कारण रिद्धिमा कपूरने तिच्या आईच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. त्यापार्टीला अगसत्य नंदा देखील उपस्थित होता. त्यामुळे करण जौहर आणि नीतू कपूरलाही कोरोना झाला असणार’, असे या युजर्सने ट्विट केले होते. परंतु, हे खोटे असल्याचे रिद्धिमाने स्पष्ट केल आहे.


हेही वाचा – बच्चन पितापुत्रापाठोपाठ आता ऐश्वर्या बच्चन आणि आराध्याही कोरोना पॉझिटिव्ह!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -