घरदेश-विदेशविकास दुबेच्या साथीदारांनी केली जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त

विकास दुबेच्या साथीदारांनी केली जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त

Subscribe
कुख्यात गुंड विकास दुबे हा चकमकीत ठार झाल्यानंतर ठाण्यातील कोलशेत येथे अटक करण्यात आलेल्या त्याच्या दोन साथीदारांना रविवारी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने ठाण्यातील सुट्टी कालीन न्यायालयात हजर करण्यात आले होते. या दरम्यान या दोघांनी आमच्या जीवाला धोका असून आम्हाला लखनौ येथे हवाई मार्गाने घेऊन जाण्यात यावे, अशा मागणीचे पत्र न्यायालयात सादर केले असल्याचे वकील अनिल जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि सोनू त्रिवेदी असे अटक करण्यात आलेल्या दोघांचे नावे आहेत. या दोघांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी ठाण्यातील कोलशेत येथून अटक केली होती. हे दोघे उत्तर प्रदेश पोलिसांच्या चकमकीत ठार झालेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे साथीदार आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश जिल्हा कानपूर येथील चौबेपुर ठाणा येथे झालेल्या आठ पोलिसांच्या हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या दोघांचा समावेश असल्याचे एटीएसने म्हटले आहे. तसेच या दोघांच्या अटकेची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ला देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, शनिवारी या दोघांना ठाण्यातील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले होते. या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी एटीएसने न्यायालयाकडे केली होती. मात्र या दोघांना न्यायालयाने २१ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुमावली असल्याचे अटकेत असलेल्या आरोपीचे वकील अनिल जाधव यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले, तसेच विकास दुबे प्रकरणामुळे आरोपीच्या जीवाला धोका असून त्यांच्या मनात एक भीती असल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्या सुरक्षितता पहाता त्यांना लखनौपर्यंत हवाईमार्गाने घेऊन जाण्यात यावे, अशा अर्ज आरोपीच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आले असल्याचे आरोपीचे वकील अनिल जाधव यांनी म्हटले आहे.

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -