घरटेक-वेकशानदार लूकसह MG Hector Plus लाँच; बुकिंग सुरू!

शानदार लूकसह MG Hector Plus लाँच; बुकिंग सुरू!

Subscribe

दीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी एमजी मोटर इंडियाने अखेर भारतीय बाजारात आपली ६ सीटर एसयूव्ही हेक्टर प्लस बाजारात लाँच केली आहे. कंपनीच्या Hector आणि ZS इलेक्ट्रिकनंतर भारतीय बाजारातील ही तिसरी कार आहे. MG Hector Plus ची किंमत १३.४९ लाख रुपये आहे. हेक्टर प्लसच्या पेट्रोल वेरिएन्टची किंमत १३.४९ लाख ते १८.२१ लाख रुपये आहे. तर डिझेल वेरिएन्टची किंमत १४.४४ लाख ते १८.५४ लाख रुपयांदरम्यान आहे.

कंपनीने या कारची बुकिंग सुरू केली असून यासाठी कंपनी ५० हजार रुपये बुकिंगची रक्कम घेत आहे. १३ ऑगस्टनंतर कंपनीचा असा विश्वास आहे की, या SUV ची किंमत ५० हजार रुपयांनी वाढणार आहे. सध्या ही सुरूवातीची किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे. ही नवीन एसयूव्ही मुळात ५-सीटर हेक्टर एसयूव्हीची ६-सीटर मॉडेल आहे. परंतु हेक्टर प्लसच्या स्वरूपात काही बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे तिचा लूक शानदार दिसतो. MG Motor India चे अध्यक्ष राजीव चाबा यांच्या मते, ही कार सेगमेंटमधील गाड्यांपेक्षा स्वस्त आहेत. या विभागातील वाहने सामान्यत: १६.४४ लाख ते २२.४३ लाख दरम्यान मिळतात.

- Advertisement -

असे आहेत वैशिष्ट्य

एमजी हेक्टर प्लसमध्ये स्मोक्ड सेपिया लेदर सीट्स, लेदर फिनिश स्टीयरिंग व्हील, फ्रंट अँड रीअर रीडिंग लाइट्स, ८ कलर एम्बियंट लाइटिंग आणि ७ इंचाचा मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले देण्यात आला आहेत.एमजी हेक्टर प्लसचे ५-आसनी हेक्टर एसयूव्हीचे इंजिन हेक्टर प्लसमध्ये घेण्यात आले आहे.

- Advertisement -

याकारमध्ये १.५ लिटर पेट्रोल, १.५ लिटर पेट्रोल हायब्रिड आणि २ लिटर डिझेल इंजिनचा समावेश आहे. ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सर्व तीन इंजिनसह स्टॅन्डर्ड आहे. याशिवाय हायब्रीड पेट्रोल इंजिनसह ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायदेखील आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -