घरताज्या घडामोडीरेल्वेचा रोबो देणार जेवण, अन् औषधांचा डोसही!

रेल्वेचा रोबो देणार जेवण, अन् औषधांचा डोसही!

Subscribe

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी मेडिकल असिस्टंट रोबोट तयार केला आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी मेडिकल असिस्टंट रोबोट तयार केला आहे. रुग्णांची विचारपुस करण्याबरोबरच त्यांच्याशी तो संवाद देखील साधणार आहे. हा रोबोट कॉम्प्युटरद्वारे चालविला जाणार असल्याने तो रुग्णाच्या नातेवाईकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलणार आहे. हा रोबोट तापमान, ऑक्सिजन संपृक्तता दूरस्थपणे मोजण्यासाठी आणि रूग्ण व डॉक्टरांशी द्वि-मार्ग व्हिडिओ संप्रेषणाद्वारे स्वयंचलितपणे सॅनिटायझर वितरणासाठी वापरला जातो. रिमोट ऑपरेशनद्वारे त्यांना अन्न / औषधे पुरवण्यासाठी देखील याचा वापर केला जाणार आहे.

 मेडिकल असिस्टंट रोबोटची निर्मिती

 मध्य रेल्वेचे  वैद्यकीय पथक कोरोना विरोधातील लढाईत युद्धपातळीवर काम करत आहे. जगभरातील परिस्थितीकडे पाहता मध्य रेल्वेच्या रेल्वे रूग्णालयांनी लॉकडाउुन लागू होण्यापूर्वीच तयारी सुरू केली. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद व जागतिक आरोग्य संघटना यांच्या अद्ययावत मार्गदर्शक सुचनांनूसार व्हेंटिलेटर कार्यशाळा, पीपीई डोनिंग व डॉफिंग, संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना, व्यवस्थापनासाठी प्रोटोकॉल इत्यादींसह डॉक्टर आणि कर्मचार्‍यांचे सघन आणि वारंवार प्रशिक्षण घेण्यात आले आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी मेडिकल असिस्टंट रोबोट तयार केला आहे.

- Advertisement -

रेल्वेचे मेडिकल स्टाफ २४x७ सज्ज

मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, पुणे आणि सोलापूर विभागातील रूग्णांच्या देखरेखीसाठी डॉक्टर आणि पॅरा-मेडिकल स्टाफची गरज भागविण्यासाठी वैद्यकीय विभागाने वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग सिस्टर आणि इतर तंत्रज्ञांची कराराच्या आधारावर नेमणूक केली आहे.  जेणेकरुन या महत्त्वपूर्ण काळात मध्य रेल्वेच्या कोणत्याही विभागात डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांची कमतरता भासू नये.24×7 सर्व प्रकारच्या कोविड आणि नॉन-कोविड रूग्णांना हाताळण्यासाठी पायाभूत सुविधा, तसेच डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफचे कठोर प्रशिक्षण विकसित करणे केवळ डॉक्टर्स आणि पॅरामेडिक्सच्या समर्पित टीममुळे शक्य झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -