घरCORONA UPDATECorona : एकाच लॅबमधून महिलेची चाचणी; एक रिपोर्ट पॉझिटिव्ह तर एक निगेटिव्ह

Corona : एकाच लॅबमधून महिलेची चाचणी; एक रिपोर्ट पॉझिटिव्ह तर एक निगेटिव्ह

Subscribe

उल्हासनगर शहरात कोरोना चाचणीचे काम मेट्रो पोलीस या खासगी लॅबद्वारे करण्यात येत आहे. नुकतेच एका २२ वर्षिय महिलेची कोरोना चाचणी दोन दिवसांत पॉझिटिव्ह व निगेटिव्ह आल्याने या लॅबच्या विश्वासार्हतेबाबत शंका उपस्थित झाली आहे. साशंकता निर्माण झाली आहे.

उल्हासनगर कॅम्प नं. ३ येथील शांतीनगर जवळ असलेल्या बाबानगरमध्ये एक २२ वर्षीय महिलाआपल्या परिवारासह राहत आहे. तिने ११ जुलै रोजी गोल मैदान येथे असलेल्या मेट्रो पोलीस लॅबमध्ये जावून कोरोना चाचणी केली. तर त्या चाचणीचा रिपोर्ट १२ जुलैला पॉझिटिव्ह आला. दरम्यान, त्या महिलेला काही लक्षणे नसताना कोरोनाचा चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा आला. याबाबत तिला लॅबच्या रिपोर्टवर संशय निर्माण झाला. तेव्हा त्या महिलेने पुन्हा १३ जुलै रोजी त्याच लॅबध्ये कोरोना चाचणी केली. तर त्या चाचणीचा रिपोर्ट १४ जुलै रोजी निगेटिव्ह आला. म्हणजेच दोन दिवसातच कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आल्याने ती महिलादेखील गांगरून गेली आहे. दरम्यान, मेट्रो पोलीस लॅबचा हा काय प्रकार आहे, हेच समजून येत नसून या लॅबवर शासनाने बंदी आणून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना शाखा प्रमुख नासिर खान यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

COVID-19 Alert: ‘हे’ आहेत कोरोनाचे ११ लक्षणं; जाणून घ्या, कोणते आहेत धोकादायक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -