घरताज्या घडामोडीMumbai Corona Update: मुंबईत आज कोरोनाचे १,४९८ नवे रुग्ण, तर ५६ जणांचा...

Mumbai Corona Update: मुंबईत आज कोरोनाचे १,४९८ नवे रुग्ण, तर ५६ जणांचा मृत्यू

Subscribe

आज दिवसभरात मुंबईमध्ये ७०७ रूग्णांनी कोरोनावर केली मात

मुंबईत आज कोरोनाचे १ हजार ४९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९७ हजार ७५१ वर पोहचली आहे. तर ५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ५२० वर पोहचला आहे.

आज दिवसभरात मुंबईमध्ये ७०७ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत मुंबईत ६८ हजार ५३७ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमध्ये आज १ हजार ४९८ नवे रुग्ण सापडले असून ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३९ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ४१ पुरुष तर १५ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ५ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३१ जण हे ६० वर्षांवरील, तर २० जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचे ८०० संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार ४७८ वर पोहचली आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. तर २४ तासात ७०७ कोरोना रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६८ हजार ५३७ इतकी आहे. दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ७०% आहे. तर सध्या कोरोनाचे एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा २३ हजार ६९४ आहे.


Corona Update: राज्यात २४ तासांत ८,६४१ नव्या रूग्णांची नोंद; २६६ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -