घरताज्या घडामोडी390 नवे रूग्ण : नाशिक जिल्हा ८ हजारपार

390 नवे रूग्ण : नाशिक जिल्हा ८ हजारपार

Subscribe

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि.१६) दिवसभरात 39० नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण १४४, नाशिक शहर २३२, मालेगाव ११ आणि जिल्ह्याबाहेरील ३ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये नाशिक शहर ५ आणि नाशिक ग्रामीणमधील एका रूग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ५ दिवसांत एक हजार नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. १२ जुलै रोजी जिल्ह्यात ७ हजार २ रूग्ण होते. गुरुवारअखेर जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ८ हजार ९४ वर पोहचला आहे. एकट्या नाशिक शहरात ४ हजार 834 रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आजवर ५ हजार 394 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण १242, नाशिक शहर 3 हजार ९४, मालेगाव 948 आणि जिल्ह्याबाहेरील १10 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार 335 रूग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीण 623, नाशिक शहर 1 हजार 547, मालेगाव 14७ आणि जिल्ह्याबाहेरील १8 रूग्ण आहेत. गुरुवारी दिवसभरात 878 संशयित रूग्ण दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय ७, नाशिक महापालिका रूग्णालय 601, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ४, मालेगाव रूग्णालय 30, नाशिक ग्रामीण रूग्णालयात 183 रूग्ण दाखल झाले.

- Advertisement -

नाशिक कोरोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-8094 (मृत-365)
नाशिक ग्रामीण-1944 (मृत-79)
नाशिक शहर-4834 (मृत-193)
मालेगाव शहर-1174 (मृत-79)
जिल्ह्याबाहेरील-142 (मृत-14)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -