घरताज्या घडामोडीCorona: मुंबईतील उच्चपदस्थ IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

Corona: मुंबईतील उच्चपदस्थ IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

Subscribe

मुंबई पोलीस दलातील उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून गुरुवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार या अधिकाऱ्याची नुकतीच काही मंत्र्यासोबत एका महत्वाच्या विषयावर बैठक पार पडली होती. या अधिकाऱ्याला होम क्वारंटटाईन करण्यात आलेले असून या अधिकाऱ्याचे मुंबई पोलीस आयुक्तालयातील दालन आजुबाजूचा परिसर सॅनिटाईझ करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात पॉझिटिव्ह आलेले आयपीएस अधिकारी मुंबईत सर्वत्र ठिकाणी स्वतः ग्राउंड लेवलला काम करीत होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असता गुरुवारीच ते सुट्टीवर गेले. मुंबई पोलीस दलात कालपर्यंत ५० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून यात ४ अधिकारी आणि ४६ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

मुंबई पोलीस मुख्यालयात ७० पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून त्यात सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पासून पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. एकट्या मुख्य पोलीस नियंत्रण कक्षात १६ जण पॉझिटिव्ह मिळून आले होते. आतापर्यंत ७० पैकी ५० टक्के जण बरे झाले असून त्यातील अनेक जण कामावर रुजू झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.


हेही वाचा – Corona Update: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजारांच्याजवळ!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -