घरCORONA UPDATECoronavirus: हर्ड इम्युनिटीवर भारत अवलंबून राहू शकत नाही - आरोग्य मंत्रालय

Coronavirus: हर्ड इम्युनिटीवर भारत अवलंबून राहू शकत नाही – आरोग्य मंत्रालय

Subscribe

भारतातील लोकसंख्येचे प्रमाण पाहता आपण हर्ड इम्युनिटी या पर्यायावर अवलंबून राहू शकत नाही, असे वक्तव्य आरोग्य मंत्रालयाच्यावतीने आज करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनावर लस येईपर्यंत लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे. भारताचा एकूण रिकव्हरी रेट हा ६४.४ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी हर्ड इम्युनिटीकडे भारताची वाटचाल सुरु आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी उत्तर देताना आरोग्य मंत्रालयाचे ओएसडी राजेश भुषण म्हणाले की, “हर्ड इम्युनिटी हे अप्रत्यक्ष असे सरंक्षण आहे. मात्र हर्ड इम्युनिटी ही लस दिल्यानंतर तयार होऊ शकते किंवा ज्यांना संसर्ग होऊन गेला आहे त्यांच्यातच ती तयार होते.”

- Advertisement -

 

- Advertisement -

भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात हर्ड इम्युनिटी हे परिणामकारक पर्याय ठरणार नाही. यामध्ये लाखो लोकांना व्हायरसचा संसर्ग होणे आवश्यक असते. त्यातून लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येते तर अनेकांचा या प्रक्रियेत मृत्यू होतो, असेही भूषण यांनी सांगितले.

सध्या आपल्याला हर्ड इम्युनिटीचा विचार न करता कोरोनापासून वाचण्याचे उपाय योजले पाहीजेत. यासाठी मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे, सोशल डिस्टसिंग सांभाळणे अशा नियमांचे पालन करायला हवे. जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत हे नियमच लसीप्रमाणे काम करतील, असेही भूषण यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -