घरताज्या घडामोडीनवं संकट: मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, NDRF च्या तुकड्याही सज्ज!

नवं संकट: मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, NDRF च्या तुकड्याही सज्ज!

Subscribe

मुंबईवर आता कोरोनानंतर पावसाचं संकट येणार असच दिसतय. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेने हाय अलर्ट दिला आहे. सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्यासही सांगितलं आहे. तसेच नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केलं आहे. तर NDRFच्या तुकड्यांनाही सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

मिठी नदीची पातळी वाढली तर स्थलांतर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. २४ वॉर्डमध्ये तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येत असून गरज पडल्यास शाळा उघडून ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाण्याचा निचरा करण्यासाठी ६ पपिंग स्टेशन्स आणि २९९ पंप कार्यान्वित करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.

- Advertisement -

६ अग्निशमन केंद्रावर पूर बचाव पथक तैनात करण्याचे आदेशही पालिकेने दिले आहेत. NDRF च्या ३ तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच कोस्ट गार्ड, नेव्ही यांना तत्पर राहण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत.


हे ही वाचा – Sushant Sucide case: सुशांतच्या जीवाला धोका असल्याचं मुंबई पोलिसांना २५ फेब्रुवारीला कळवलं होतं!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -