घरक्रीडावर्ल्डकप स्टारला बोलावले पण नेमकं 'ट्रान्सलेटर' विसरले

वर्ल्डकप स्टारला बोलावले पण नेमकं ‘ट्रान्सलेटर’ विसरले

Subscribe

पूर्व बंगालच्या फुटबॉल क्लबकडून कोस्टा रिकाचा महत्त्वाचा डिफेंडर अकोस्टाला बोलावण्यात आले होते. ६ ऑगस्ट रोजी तो कोलकाता एअरपोर्टला पोहोचला. त्याच्याशी संवाद साधण्यासाठी खास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

नुकताच फिफा वर्ल्ड कप रशियात पार पडला. फिफाची क्रेझ जगभर किती हे सांगायलाच नको. पूर्व बंगालकडून कोस्टा रिकाचा डिफेन्डरला जॉनी अकोस्टाला भारतात येण्याचे आमंत्रण देण्यात आले. त्याच्या स्वागताची तयारी करण्यात आली. त्याच्याशी संवाद साधण्याची उत्सुक्ता सगळ्यांनाच होती. पण कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना शेवटपर्यंत ट्रान्सलेटर मिळाला नाही आणि आयत्यावेळी पत्रकार परिषद रद्द करण्यापर्यंतची वेळ आली. पण गुगल ट्रान्स्लेटरने वेळ मारुन नेली.

पत्रकारांनी घेतला आक्षेप

पूर्व बंगालच्या फुटबॉल क्लबकडून कोस्टा रिकाचा महत्त्वाचा डिफेंडर अकोस्टाला बोलावण्यात आले होते. ६ ऑगस्ट रोजी तो कोलकाता एअरपोर्टला पोहोचला. एअरपोर्टवर त्याने भारतात आल्याचा आनंद व्यक्त केला होता. कोलकातामध्ये आल्यानंतर त्याने लोकल फुटबॉल मॅचला देखील हजेरी लावली. त्यानंतर त्याच्याशी संवाद साधण्यासाठी खास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अकोस्टा फक्त स्पॅनिश बोलत असल्याने त्याला समजून घेण्यासाठी ट्रान्सलेटरची गरज होती. पण शेवटपर्यंत  आयोजकांना ट्रान्सलेटर मिळाला नाही. पण त्यांनी कार्यक्रम रद्द केला नाही. आणि पत्रकार परिषदेत त्याला नेण्यात आले. तो पत्रकारांशी बोलण्यासाठी हॉट सीटवर बसला. पण ट्रान्सलेटर नसल्यामुळे क्लबच्या सीईओंना पत्रकारांना सोपे प्रश्न विचारा, असे सांगावे लागले. शिवाय त्याला बोलू न देता त्याच्यावतीने क्लबचे सीईओ सनजीत सेन बोलू लागल्यावर पत्रकारांनी आक्षेप घेतला.

- Advertisement -

गुगल ट्रान्सलेटरची घेतली मदत

पत्रकारांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळ होऊ नये म्हणून अकोस्टाने स्वत:च गुगल ट्रान्सलेटची मदत घेतली. त्यामुळे त्याला थोडेफार समजून घेण्यास मदत झाली. पण ज्या खोलीत पत्रकार परीषद होती. त्या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन चांगले नव्हते. म्हणून सगळ्यांना दुसऱ्या खोलीत हलवण्यात आले. पण काहीच फरक पडला नाही.उलट क्लबचेच वाभाडे सगळ्यांनी काढले. त्यामुळे त्याला कमी वेळात आवरते घ्यावे लागले.

- Advertisement -

अकोस्टा भारतात खेळणार

आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल सामन्यांसाठी अकोस्टा पूर्व बंगालसाठी खेळणार आहे. त्यासाठीच तो कोलकातामध्ये आला. त्याला सामन्याविषयी विचारल्यानंतर या सामन्यांसाठी खेळण्यात आणि माझ्या टिमला ट्रॉफी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे देखील तो यावेळी म्हणाला

कोण आहे जॉनी अकोस्टा?

जॉनी अकोस्टा हा कोस्टा रिकाचा डिफेंडर असून आतापर्यंत त्याने ७१ मॅचेस खेळल्या आहेत. कोलंबियन प्रीमिअर लीग आणि रशिया वर्ल्ड कपमधील त्याची कामगिरी उल्लेखनीय होती. त्याने नेमार आणि कुटीन्होचे गोल अडवले होते. २०१४ च्या वर्ल्ड कपमध्येही तो कोस्टा रिकाकडून खेळला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -