घरताज्या घडामोडीपवार कुटुंबियातील वाद अखेर मिटला

पवार कुटुंबियातील वाद अखेर मिटला

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे नातू पार्थ पवार यांच्यात सुरु झालेला सुप्त संघर्ष अखेर निवळला असल्याची माहिती मिळत आहे. आज बारामती येथे पवार कुटुंबियांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत पवारांनी आपापसात सामंज्यसाने वादावर पडता टाकल्याचे समजत आहे. न्यूज १८ लोकमतने याबाबत बातमी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुणे येथे ध्वजारोहन केल्यानंतर बारामतीची वाट धरली होती. आज सकाळपासून बारामती येथे विविध विकास कामांच्या उदघाटनासाठी त्यांनी हजेरी लावली. दरम्यान पार्थ पवार देखील बारामती येथे उपस्थित होते. अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबियांची बैठक झाली. यामध्ये शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आजोबा-नातवामधील वाद संपुष्टात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

शरद पवार हे पुण्यात उपस्थित होते. चर्चेतून वाद मिटवला असल्याचा निरोप त्यांना मिळल्यानंतर त्यांनी पुण्यावरुन बारामतीची वाट धरली आहे. तर अजित पवार देखील बारामतीहून मुंबईला निघाले असल्याची माहिती मिळत आहे. काल बारामती येथे अजित पवार यांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या अनंतारा या निवास्थानी एक बैठक झाली. या बैठकीत काका श्रीनिवास पवार, काकू शर्मिला पवार, आई सुनेत्रा पवार यांनी पार्थची समजूत काढली असल्याची माहिती मिळत आहे, अशी बातमी लोकमतने दिलेली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -