घरताज्या घडामोडीधक्कादायक! उघड्या गटारात पडून चिमुरडीचा मृत्यू

धक्कादायक! उघड्या गटारात पडून चिमुरडीचा मृत्यू

Subscribe

नालासोपारा पूर्वेकडील धानीव बाग परिसरात एका दीडवर्षीय चिमुरडीचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्वीटी वीरेंद्र पाल असे तिचे नाव असून घरातून खेळायला बाहेर पडल्यावर ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

बुधवारी दुपारच्या सुमारास चिमुरडी घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. काही वेळाने ती दिसेनाशी झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कुठेच आढळून आली नाही. संध्याकाळी उशिरा परिसरातील उघड्या गटारात तिचा मृतदेह सापडला. गेल्यावर्षी याच परिसरात एका चार वर्षीय लहान मुलाचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाला होता. अद्यापि महापालिकेच्या वतीने उघड्या गटारांवर झाकणे लावली गेली नाहीत, अथवा त्यांची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा बळी गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या परिसरात बैठ्या चाळी आहेत. तसेच अनेक ठिकाणी गटारे आहेत. या गटारांच्या चेंबरची दुरवस्था झाली आहे. मागील काही वर्षांपासून ही उघडी गटारे परिसरातील लहान मुलांच्या मृत्यूचे कारण बनत आहेत. या संदर्भात स्थानिक नगरसेवक आणि महापालिका यांना वारंवार मागणी करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Ganeshotsav 2020: कोरोनामुळे मीरा-भाईंदरमध्ये गणेश मूर्तींची होम डिलिव्हरी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -