घरताज्या घडामोडीरेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; ३४ मेट्रिक टन ओएचई सामग्रीसह १७ चोरट्यांना अटक!

रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; ३४ मेट्रिक टन ओएचई सामग्रीसह १७ चोरट्यांना अटक!

Subscribe

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या इंटेलिजेंस विंग आणि कुर्ला आरपीएफ जवानांनी मिळून रेल्वे सामग्री चोरट्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. आरपीएफ पोलिसांनी सापळा रचून कुर्ला येथील डिझेल शेडजवळ २५.६ लाख रुपये मूल्य असलेल्या ३४ मेट्रिक टन वजनाच्या ओएचई सामग्रीसह १७ चोरट्यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे आरपीएफ इंटेलिजेंस विंग आणि कुर्ला आरपीएफ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या इंटेलिजेंस विंग यांना गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाली होती की, कुर्ला डिझेल शेडजवळ रेल्वेची ठेवलेली ओएचई सामग्री काही चोरटे चोरण्याचा बेत आखत आहेत. याच माहितीच्या आधारावर इंटेलिजेंस विंग आणि कुर्ला आरपीएफचे इन्स्पेक्टर यांनी सापळा रचून कुर्ला भागात छापा टाकला. या छाप्यादरम्यान २५.६ लाख रुपये मूल्य असलेल्या ३४ मेट्रिक टन वजनाच्या ओएचई सामग्रीसह १७ व्यक्तिंना अटक केली. तसेच त्यांच्याकडून एक ट्रक, एक स्कूटी, १५ ऑक्सिजन सिलिंडर, ५ व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि ९ गॅस कटर जप्त केले. एक ट्रक सामग्री आधीच उघडकीस आणण्यात आली आहे. ही कारवाई कुर्ला निरीक्षक पी.आर. मीना, निरीक्षक एस.के. कोस्ता, दादर आणि पनवेल आरपीएफ इंटेलिजेंस विंगचे निरीक्षक अमित राघव यांनी सहाय्यक सुरक्षा आयुक्त संजीव राणा यांच्या मार्गदर्शनाखाली समर्पित प्रयत्नांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. रेल्वे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कुर्ला येथे ओएचई स्थापित करण्यासाठी ओएचई सामग्री खरेदी केली गेली होती आणि कुर्ला येथील डिझेल शेडजवळ ठेवली गेली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -