घरताज्या घडामोडीमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अद्यापही दीर्घ कोमात

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अद्यापही दीर्घ कोमात

Subscribe

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. काही दिवसांपूर्वी प्रणव मुखर्जी कोमात गेल्याची माहिती आर्मी रुग्णालयाने दिली होती. शिवाय, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याने प्रणव मुखर्जींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, अद्यापही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत नसल्याचे त्यांच्यावर उपचार सुरु असलेल्या दिल्ली कॅन्टोन्मेंटच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटललने कळवले होते. तसेच अद्यापही ते दीर्घ कोमात असून व्हेटिंलेटरवर असल्याचे रुग्णालयाच्या हवाल्याने एएनआयने ट्विट केले आहे. प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीबाबतचे सर्व महत्वाचे वैद्यकीय मापदंड स्थिर असल्याचेही रुग्णालयाने म्हटले आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले होते?

राजाजी मार्ग येथील घरी प्रणव मुखर्जी यांचा पाय घसरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. तसेच त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाली होती. ही गाठ काढण्यासाठी त्यांच्यावर मेंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.

प्रणव मुखर्जी यांची १० ऑगस्टपासून प्रकृती बिघडली होती. १० तारखेच्या एक दिवस आधीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र, तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. दरम्यान, आता ते कोमात गेले आहेत, असे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कैलास मानसरोवर भागात ड्रॅगन ची घुसखोरी, क्षेपणास्त्र तळ उभारण्याच्या तयारीत!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -