घरक्रीडाIPL : मी युएईमध्ये परतून आयपीएल स्पर्धा खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही!

IPL : मी युएईमध्ये परतून आयपीएल स्पर्धा खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही!

Subscribe

रैनाने वैयक्तिक कारणांमुळे अचानक आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती.

चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख फलंदाज सुरेश रैनाने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून अचानक माघार घेतली. रैना हा आयपीएलमध्ये चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने यंदा या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेणे हा चेन्नईसाठी मोठा धक्का होता. रैनाने अचानक माघार घेण्यामागे काय कारण होते याची मागील काही दिवसांत बरीच चर्चा सुरु होती. दुबईमध्ये चेन्नईचा संघ राहत असलेल्या हॉटेलमध्ये रैनाला जी खोली देण्यात आली होती, त्याला बाल्कनी नसल्याने तो नाराज झाला आणि त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला असेही म्हटले जात होते. रैनाने यावर काहीही स्पष्टीकरण दिले नव्हते. मात्र, आता त्याने त्याचे मौन सोडले आहे.

चेन्नई संघही माझ्या कुटुंबाप्रमाणेच

मला माझ्या कुटुंबासाठी भारतात परतावे लागले. हा माझा वैयक्तिक निर्णय होता. माझ्या घरी काही अवघड परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मला कुटुंबासोबत राहायचे होते. चेन्नई संघही माझ्या कुटुंबाप्रमाणेच आहे आणि धोनीला माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे अचानक मायदेशी परतण्याचा निर्णय घेणे मला अवघड गेले, असे रैना एका मुलाखतीत म्हणाला.

- Advertisement -

आणखी ४-५ वर्षे आयपीएल स्पर्धेत खेळत राहायचेय

माझ्यात आणि चेन्नईच्या संघात कोणताही वाद नाही. कोणतीही व्यक्ती १२.५ कोटी रुपयांकडे उगाचच पाठ फिरवणार नाही. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो असलो, तरी मला आणखी ४-५ वर्षे आयपीएल स्पर्धेत खेळत राहायचे आहे. इथे क्वारंटाईनमध्ये असतानाही मी क्रिकेटचा सराव करत होतो. आता मी पुन्हा युएईमध्ये परतून चेन्नई संघात दाखल होण्याची आणि आयपीएल खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही रैनाने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -