घरताज्या घडामोडी'बदल्या या राज्याच्या हिताच्या', संजय राऊतांचे विरोधकांना उत्तर

‘बदल्या या राज्याच्या हिताच्या’, संजय राऊतांचे विरोधकांना उत्तर

Subscribe

बदल्या करु नका असे कोणत्या कायद्याच्या पुस्तकात लिहिले आहे. तुमच्या लोकांनाच वर्षानुवर्ष ठेवून राज्य करावे का?, संजय राऊत यांनी विचारला सवाल.

गेले काही दिवस चर्चेत असलेल्या पोलीस खात्यातील बदल्यांना अखेर बुधवारी मुहूर्त मिळाला आणि ४५ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. याबात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी ‘बदल्या या महाराष्ट्र राज्याच्या हिताच्या’, असल्याचे म्हणत विरोधकांना उत्तर दिले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बदल्यांचा धंदा करतंय असा, आरोप केला आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘नवीन सरकार आल्यानंतर बदल्या करु नये, असे घटनेत लिहिले आहे का? बदल्या करु नका असे कोणत्या कायद्याच्या पुस्तकात लिहिले आहे. तुमच्या लोकांनाच वर्षानुवर्ष ठेवून राज्य करावे का? बदल्या काय फक्त आम्हीच केल्या का? बदल्या करुन आम्ही काय नवीन चमत्कार केला का? मनमोहन सिंग यांचे सरकार जाऊन मोदींचे सरकार आले तेव्हा बदल्या केल्या नाही का? बदल्या राज्याच्या हिताच्या आहेत आणि तो करण्याचा अधिकार लोकनियुक्त सरकारला आहे’. सामना कार्यालयात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंना काही हौस नाही

‘राज्यातील मंदिरे उघडली जावीत अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची देखील मनापासून इच्छा आहे. त्यामुळे योग्य वेळ आली का मुख्यमंत्री निर्णय घेतली. त्यामुळे सगळे बंद करण्याची त्यांना काही हौस नाही,’ अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले आहे. ‘तसेच अनेक मंदिरे आणि देवस्थानांनी कोविडशी लढण्यासाठी सरकारला मदत केली आहे’, असेही ते यावेळी म्हणले आहेत.

- Advertisement -

‘देशासह राज्यात आणि मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्याच्यात भर पडू नये आणि लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची भावना आहे. त्यामुळे ही भावना समजून घेतली पाहिजे. विरोधकांनी त्यावर मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा केली पाहिजे. रस्त्यावर उतरुन संकट वाढवू नये. लोकांच्या जीवाशी खेळू नका. संयम बाळगणं गरजेचं आहे,’ असे म्हणत प्रकाश आंबेडकर आणि जलील यांना संजय राऊत यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.


हेही वाचा – ‘भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरुच, मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का?’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -