घरCORONA UPDATECorona Vaccine खरेदीसह वितरणासाठी तब्बल ७६ देश आले एकत्र!

Corona Vaccine खरेदीसह वितरणासाठी तब्बल ७६ देश आले एकत्र!

Subscribe

जगभरात कोरोना लशींचे वितरण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी स्थापन झालेल्या 'कोवॅक्स' मध्ये आतापर्यंत ७६ देशांनी आपला सहभाग नोंदवला

जागतिक आरोग्य संघटनेच्या सह-नेतृत्वातून जागतिक पातळीवर कोरोना लशीचे वितरण करण्यात येणार आहे. यामुळे कोरोना लस वाटपात गरीब देशांसोबत कोणताही भेदभाव होणार नसल्याचे सांगितले जात आहे तर या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी लस विकसित झाल्यानंतर त्याची खरेदी आणि वितरण योग्य प्रकारे होण्यासाठी जगभरातील ७६ देश एकत्र आले आहेत.

कोवॅक्समध्ये ७० हून अधिक देश सहभागी

गावी वॅक्सीन अलायन्स (Gavi, the Vaccine Alliance) लसीच्या किंमती ठरवण्याबाबतही पुढाकार घेतला आहे. जगभरातील विविध आजारांच्या लसींच्या समन्वयाचे काम गावी वॅक्सीन अलायन्स करत असते. मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात लसींचे वितरण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी कोवॅक्स केंद्राचीही स्थापना करण्यात आली आहे. कोवॅक्स केंद्राचे सहप्रमुख आणि गावी वॅक्सीन अलायन्सचे सीईओ सेथ बर्कले यांनी सांगितले की, जपान, जर्मनी, नॉर्वेसह ७० हून अधिक देशांनी कोवॅक्समध्ये सहभागी होण्यासाठी पाठिंबा दर्शवला असून स्वाक्षरी केली आहे, तर या देशांनी कोरोना व्हायरसची लस खऱेदी करण्यास सध्यातरी मंजुरी दिली आहे.

- Advertisement -

७६ देशांनी लस खरेदी करण्यासाठी तसेच, आपल्या देशातील नागरिकांपर्यंत लस पोहचवण्याची हमी दिली आहे. कोवॅक्समध्ये सहभागी देशांची संख्या आणखी वाढणार असून कोवॅक्सच्या समन्यवयांकडून चीन सरकारसोबत चर्चा सुरू असल्याचे बर्कले यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले आहे.

भारतात प्रति डोसची एवढी असेल किंमत

श्रीमंत देशांमध्ये कोरोना लशीची किंमत ४० डॉलर म्हणजे जवळपास तीन हजार रुपये ठेवणार असल्याची माहिती आहे. तर, गरीब आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांना यापेक्षाही कमी दरात लस देण्यात येणार आहे. युरोपीयन संघाच्या सूत्रांच्या माहितीनुसार श्रीमंत देशांमध्ये ही लस ४० डॉलरमध्ये उपलब्ध होणार आहे. युरोपीय संघ कोवॅक्ससह इतर पर्यायांमार्फत ही लस उपलब्ध करणार आहेत. भारतातील सिरम इन्स्टिट्यूटने ही कोवॅक्समध्ये सहभाग नोंदवला आहे. भारतामध्ये ऑक्सफर्ड विकसित करत असलेली लस प्रति डोस २२५ रुपयांना मिळणार आहे.


अमेरिकेत ‘या’ महिन्यात उपलब्ध होणार Covid-19 ची लस
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -