घरCORONA UPDATEपुण्यातही होऊ शकते जमावबंदी लागू; अजित पवार यांनी दिले संकेत

पुण्यातही होऊ शकते जमावबंदी लागू; अजित पवार यांनी दिले संकेत

Subscribe

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवेंसदिवस वाढत चालला असून त्यामध्ये पुणे जिल्हा अग्रेसर आहे. पुण्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत असून मुंबईप्रमाणे पुण्यातही जमावबंदी लागू होण्याची शक्यता आहे. यासंबंधी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करून प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे अजित पवार यांनी पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरतील कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत म्हटले आहे.

- Advertisement -

पुणे येथील विधानभवन सभागृहात आज, शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हिसीद्वारे), पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, अन्य लोकप्रतिनिधी आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अजित पवार यांनी दिलेल्या सुचना 

  • शहरी भागासह ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी होणे गरजेचे असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.
  • कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करून देईल. रुग्णांना वेळेत ऑक्सिजनयुक्त खाटा व योग्य उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने काम करावे.
  • ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच भागात उपचार मिळवून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून द्यावीत.
  • येथील ऑक्सिजनयुक्त बेड व अन्य सोयी सुविधांसाठीची अपुरी कामे आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीने पूर्ण करून घ्यावीत, अशी सूचना करून नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयांसाठी विशेष बाब म्हणून तात्काळ पदनिर्मिती करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील.
  • पुणे जिल्ह्यात गृह सर्वेक्षणावर भर देवून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवावी. यात लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्था व नागरिकांना सहभागी करून घ्यावे.

हेही वाचा –

Maratha Reservation: ‘…तर कोणत्याही परिस्थितीत मी राजीनामा देणारच’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -