घरCORONA UPDATEचिंतेत वाढ! देशात बाधितांचा आकडा ५३ लाखांचा पार! २४ तासांत ९३,३३७ नवे...

चिंतेत वाढ! देशात बाधितांचा आकडा ५३ लाखांचा पार! २४ तासांत ९३,३३७ नवे रूग्ण

Subscribe

देशातील कोरोना मृत्यूचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा कमी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतातही झपाट्याने होत आहे. देशात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येने ५३ लाखांचा टप्पा पार केला आहे. शनिवारी देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांत किंचित घट झाली असली तरी हा आकडा ९० हजारांच्या पलीकडे आहे. त्यामुळे देशातील चिंता कायम तशीच आहे, असे म्हणता येईल.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९३ हजार ३३७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर एक हजार २४७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाख ८ हजार १५ झाली आहे. १० लाख १३ हजार ९६४ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले

देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. सध्या १० लाख १३ हजारांवर अॅक्टिव्ह रूग्ण असले तरी आतापर्यंत ४२ लाख ८ हजार ४३२ रुग्णांना कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर देशात आतापर्यंत ८५ हजार ६१९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मृत्यूचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा कमी

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्णांची रिकव्हरी रेट ७९.२८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे तर मृत्यूच्या दरात घट झाली आहे. त्याच वेळी, १९. १० टक्के रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृत्यूचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -