घरताज्या घडामोडीकरण जोहरच्या पार्टीवर NCBची नजर, पार्टीत कोकीनचा वापर केल्याचा संशय

करण जोहरच्या पार्टीवर NCBची नजर, पार्टीत कोकीनचा वापर केल्याचा संशय

Subscribe

सुशांतसिह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन जोडले गेल्याने बॉलिवूडची मोठी नावं एनसीबीच्या रडारवर आहेत. दरम्यान २७ जुलै २०१९ रोजी करण जोहरच्या घरातील पार्टीची देखील एनसीबीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. या पार्टीमध्ये ड्रग्ज, कोकीनचा वापर केला असल्याचा संशय एनसीबीचा आहे. त्यामुळे या पार्टीत उपस्थित असलेले बॉलिवूड सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवरही येऊ शकतात.

करण जोहरच्या या पार्टीवर एनसीबीची आता नजर असणार आहे. २७ जुलै रोजी झालेल्या या पार्टीमध्ये कोकीन वापरल्याचा एनसीबीला संशय आहे. अभिनेत्री रकुल प्रीतच्या चौकशीनंतर या पार्टीची चौकशी सुरू होऊ शकते. रकुल प्रीतच्या चौकशीनंतर एनसीबी कार्यालयात पोहोचलेला केपीएस मल्होत्रा, ​करण जोहरच्या निकट निर्माता क्षितीज प्रसाद चौकशीत सामील आहेत.

- Advertisement -

करण जोहरच्या या पार्टीत दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, विक्की कौशल, रणबीर कपूर, मीरा राजपूत, शाहिद कपूरची असे स्टार उपस्थित होते. करण जोहरने या पार्टीचा व्हिडिओ २८ जुलै २०१९ रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.

View this post on Instagram

Saturday night vibes

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

- Advertisement -

दरम्यान धर्मा प्रोडक्शनशी संबंधित असलेला निर्मात क्षितीज प्रसाद याचे नाव ड्रग्ज पेडलरच्या चौकशीत समोर आले. यामुळे क्षितीज प्रसादला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले. त्याचबरोबर अभिनेत्री दीपिका पादुकोणला समन्स बजावला असून उद्या तिची एनसीबी चौकशी करणार आहे.


हेही वाचा – दाक्षिणात्य, हिंदी गाण्यांचा सुमधूर आवाज हरपला; बालसुब्रमण्यम यांच्या निधनावर प्रतिक्रिया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -