घरताज्या घडामोडीलडाखमध्ये भारतीय लष्कराचे रणगाडे तैनात

लडाखमध्ये भारतीय लष्कराचे रणगाडे तैनात

Subscribe

पूर्व लडाखमध्ये सीमेवर भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून तणाव सुरू आहे. हा सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमधील लष्करी कमांडर स्तरावर अनेक बैठकाही घेण्यात आल्या. मात्र, चीनने अद्याप नियंत्रण रेषेवरून मागे हटण्यास तयारी दर्शविली नाही.चीनच्या या आडमुठीपणामुळे भारताने आता सीमेवरील आपली बाजू बळकट करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय लष्कराने रविवारी लेहपासून २०० कि.मी. अंतरावर असलेल्या पूर्व लडाखच्या चुमर डेमचोक भागात रणगाडे आणि वाहने तैनात केली आहेत.

भारतीय लष्कराने एलएसीजवळील चुमार-डेमचोक भागात बीएमपी -२ इन्फंट्री कॉम्बॅट वाहनांसह टी -९० आणि टी -७२ रणगाडे तैनात केले आहे. या रणगाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्व लडाखमधील शत्रूवर उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात हल्ला करू शकतात. फायर अँड फ्युरी भारतीय लष्कराचे एकमेव स्थापित करण्यात आले आहे. जगभरातील देशांच्या अशा कठीण भागात यंत्रसामुग्री दलांना तैनात केले आहे, असे एलएसीवर टी -९० आणि टी-७२ रणगाडे तैनात केल्यानंतर १४ कोर्प्सचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल अरविंद कपूर यांनी सांगितले.

- Advertisement -

याचबरोबर, चीनसोबत सुरू असलेल्या तणावाबाबत अरविंद कपूर यांनी भाष्य केले. यावेळी दल आणि उपकरणांची तयारी सुनिश्चित करण्यासाठी जवान आणि मशीन या दोघांसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे, असे अरविंद कपूर यांनी सांगितले. दरम्यान, या भागात रणगाडे, लढाऊ वाहने व अवजड तोफा तैनात करणे एक आव्हान आहे.टी-९० भीष्म रणगाडेमध्ये तीन प्रकारचे इंधनपूर्व लडाखच्या चुमार-डेमचोक भागात वास्तविक नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराचे टी-९० भीष्म रणगाडे तैनात करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत येथील तापमान ऋण असते. अशा परिस्थितीत या रणगाड्यामध्ये तीन प्रकारचे इंधन वापरले जाते. जेणेकरून हिवाळ्यामध्ये ते गोठू नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -