घरमहाराष्ट्र'पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय राज्य शासनाकडे पर्याय नाही'

‘पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय राज्य शासनाकडे पर्याय नाही’

Subscribe

राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागांचा दौरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करत आहेत. काल, रविवारी त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला असून आज, सोमवारी त्यांनी तुळजापूर जिल्ह्यातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रावर ऐतिहासिक आर्थिक संकट आल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय राज्य शासनाकडे पर्याय नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले शरद पवार –

यंदाच्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रावर ऐतिहासिक आर्थिक संकट आले आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्यासाठी आग्रह करणार. अवकाळी पावसामुळे संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा संकटात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे अधिक प्रमाण आहे. यामध्ये उस्मानाबाद, लातूर, नांदेड, पंढरपूर, इंदापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच सोयाबीनच पीक अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्थ झाले आहे. दरम्यान, पीकविम्याच्या निकषाबाबतही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. वाहूव गेलेल्या पीकासंदर्भात तरतूद करण आवश्यक आहे. केंद्र, राज्याशी पीकविम्यासंबंधी चर्चा करू. पीक विम्यात शिथिलता देण्यासाठी केंद्राकडे मागणी करू. यावेळी त्यांनी सोयाबीन उत्पादनाचे वर्ष वाया गेले असल्याचे म्हटले. तसेच अतिवृष्टीचा उसालाही मोठा फटका बसला आहे. शेतजमिनीचेही नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी शेतातील बांधबंदिस्तिचीही हानी झाली असून अतिवृष्टीच्या संकटाला महाराष्ट्र तोंड देत आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुख्यमंत्री मुंबई का सोडत नाहीत यावर पवार म्हणाले की, आम्हीच मुख्यमंत्र्यांना एकाच ठिकाणी बसून नियोजन करण्याची विनंती गेली आहे. प्रशासनाला नियोजन करून निर्णय घ्यावे लागतात. राज्यावर आलेल्या संकटात केंद्राला मदत करावी लागेल. संपूर्ण संकटाच ओझ एकट्या राज्य सरकारला झेपेल का, असा सवाल त्यांची यावेळी केला.

हेही वाचा –

मुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -