घरमहाराष्ट्रWeather Alert: येत्या २४ तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाची शक्यता

Weather Alert: येत्या २४ तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाची शक्यता

Subscribe

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यात असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

बंगालच्या उपसागरात मागील आठवड्यासारखा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे संकेत असून त्यामुळे या आठवड्यात देखील राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाल्यामुळे देशातील अनेक भागांत आज हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनाऱ्यापासून दूर जात आहे, यामुळे पश्चिमी किनाऱ्यालगत याचा काहीही परिणाम दिसणार नाही. पुढच्या ४८ तासांमध्ये ते पश्चिम ते दिशेने पुढे सरकत त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यात असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनाऱ्यापासून दूर जात आहे, यामुळे पश्चिमी किनाऱ्यालगत याचा काहीही परिणाम दिसणार नाही. पुढच्या ४८ तासांमध्ये ते पश्चिम ते दिशेने पुढे सरकत त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यात असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

आज सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रावरून नुकताच गेलेला कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातकडे सरकला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. आता १८ ते २१ ऑक्टोबरदरम्यान तमिळनाडू, आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि तेलंगणामध्ये मुसळधार, तर २० ऑक्टोबरला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. यामुळे आंध्र प्रदेश, यानम आणि रायलिसमा इथं पुढचे ४ दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पुढच्या २४ तासांमध्ये गुजरात, नागालँड, मणिपूर, मिजोरम, त्रिपुरा आणि अंदामान व निकोबार बेटांवर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह महाराष्ट्र, गंगा पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण आणि दक्षिणपूर्व राजस्थान आणि तामिळनाडू या भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच कर्नाटक, केरळ आणि दक्षिण मध्य प्रदेशातही पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे.


देशात फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाची साथ येणार आटोक्यात; शास्त्रज्ञांचा दावा

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -