घरमहाराष्ट्रदहावी, बारावीच्या फेरपरीक्षा २० नोव्हेंबरपासून

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा २० नोव्हेंबरपासून

Subscribe

दहावी व बारावीची लेखी परीक्षा २० नोव्हेंबरपासून तर तोंडी परीक्षा १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर २० ऑक्टोबरला जाहीर करण्यात आले आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२० च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचे वेळापत्रक राज्य मंडळाने मंगळवारी जाहीर केले. दहावी व बारावीची लेखी परीक्षा २० नोव्हेंबरपासून तर तोंडी परीक्षा १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर २० ऑक्टोबरला जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी व बारावी पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. फेब्रुवारी-मार्च २०२० च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ न शकलेल्या तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात येत आहे. त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरला होणार आहे. तर प्रात्याक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा १८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा २० नोव्हेंबर ते १० डिसेंबरपर्यंत तसेच बारावी व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा २० नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत होणार आहे. तर प्रात्याक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान होणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ते फक्त विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आहे.

- Advertisement -

परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे विभागीय मंडळातर्फे छापील स्वरुपात दिलेले वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षांच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थित राहावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने किंवा खासगी यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्स अपच्या माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरण्यात येऊ नये अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -