घरताज्या घडामोडीआठ वर्षांनंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनाली परतणार छोट्या पडद्यावर, 'या' भूमिकेत दिसणार

आठ वर्षांनंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनाली परतणार छोट्या पडद्यावर, ‘या’ भूमिकेत दिसणार

Subscribe

मराठी अभिनेत्री सोनाली खरे तब्बल आठ वर्षांनंतर दसऱ्याच्या मुहुर्तावर टेलिव्हिजनवर परतणार आहे. २०१४ मध्ये ‘बे दुणे दहा’ ह्या टिव्ही मालिकेमध्ये सोनाली खरे दिसली होती. त्यानंतर तिने ‘७, रोशन व्हिला’, ‘हृदयांतर’, सिनेमांमध्ये काम केले. आता सोनाली आठ वर्षांनंतर टेलिव्हिजन विश्वात परततेय. कलर्स मराठीवरच्या ‘आज काय स्पेशल’ ह्या कुकिंगविषयक शोमध्ये सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत ती दिसणार आहे.

- Advertisement -

आपल्या कमबॅकविषयी सोनाली खरे म्हणते, ‘मला आनंद आहे की, मी पुन्हा एकदा माझ्या आवडत्या टीव्ही क्षेत्रात परततेय. स्वयंपाक करणे, कोणत्याही गृहिणीला नवीन नाही आणि मला पहिल्यापासूनच बेकिंगची आवड होती. पण लॉकडाउनमध्ये मी भरपूर नव्या रेसिपी शिकले. त्यामूळे जणू ह्या शोची रंगीत तालिम झाली होती. त्यात मला माझ्या काही पूर्वीच्या सहकलाकारांसोबतही ह्या शोमुळे स्क्रिन शेअर करायला मिळणार आहे, ह्याचा एक वेगळाच आनंद आहे.’

- Advertisement -

सोनालीने ह्याअगोदर ‘कॉलेज माझी जान’, ‘गमंतगढ’, ‘आम्ही सारे खवैय्ये’, अशा टेलिव्हिजन शोजचे सुत्रसंचालन केले होते. आता सोनालीच्या चाहत्यांना दसऱ्यापासून तिला टेलिव्हिजनवर पुन्हा पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

ह्या शोची खासियत सांगताना सोनाली म्हणते, ‘इतर कुकिंगविषयीच्या शोमध्ये फक्त येणारे पाहुणेच रेसिपी दाखवतात. पण इथे मात्र मीही काही पदार्थ तयार करणार आहे. योगाभ्यांसामुळे शिकलेल्या काही टिप्स आणि काही किचनटिप्सही मी शेअर करणार आहे. आलेल्या पाहुण्यांसोबत माझ्या कुकिंगविषयीच्या गप्पा रंगणार आहेत. काही फुडरिलेटेड खेळही असतील. जे प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजक वाटतील. असे मला वाटते.’

View this post on Instagram

I have been a foodie my entire life and then turned into a double-foodie when I married a Punjabi who’s a big foodie himself 😅 During this Lockdown, I discovered that I’m not a bad cook myself 😃 So now, imagine my joy when I am invited by my favourite channel Colours Marathi to host a show which will bring you scrumptious recipes and lot of interesting gup-shup with your favourite actors. Super happy and thrilled to host ‘Aaj Kay Special’ on @colorsmarathiofficial every Saturday and Sunday at 1 pm starting from 25th October. Let’s cook some good food and create beautiful memories and bountiful happiness 😀 Do watch it & keep showering your love as always ❤️ #aajkayspecial #cookingathome #loveforfood #instagramchef #gratitude #newbegginings #shooting #happinessisfood #foodlovers #begratefuleveryday #

A post shared by Sonnali K khare (@iamsonalikhare) on

‘न्यू नॉर्मल’मध्ये शूटिंग करण्याच्या अनुभवाबद्दल सोनाली म्हणते, ‘सतत मास्क घालण्याची सवय नसते. त्यामुळे पूर्णवेळ मास्क घालून शूटिंगस्थळी राहणे, हे थोडे दमछाक करवणारे असले, तरीही आपल्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहे, असे मला वाटते. स्वादिष्ट जेवण बनवण्याची पहिली पायरी ही स्वच्छता (hygine) आहे. त्यामुळे सेटवरचे वातावरण तसेच असते, ह्याचा मला आनंद आहे.’


हेही वाचा – जूनमध्ये मृत्यू पावलेल्या अभिनेत्याच्या घरी गोंडस मुलाचं आगमन; ज्युनिअर चिरंजीवीचा फोटो व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -