घरमहाराष्ट्रभंडाऱ्यातील लाखनी शहरात फटाका सेंटरला मध्यरात्री भीषण आग

भंडाऱ्यातील लाखनी शहरात फटाका सेंटरला मध्यरात्री भीषण आग

Subscribe

या घटनेत दोन दुकानं जळून खाक

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरातील अंबिका फटाका सेंटरला मध्यरात्री भीषण आग लागल्याची माहिती समोर येत असून या घटनेत दोन दुकानं जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सध्या आहे.

अवघ्या काही क्षणात आगीचे रौद्ररुप

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी लाइन परिसरात मेहर यांच्या अंबिका फटाका सेंटर ला मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. फटाका सेंटर असल्यामुळे अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररुप घेतले. आग इतकी भीषण होती की, फटका सेंटरच्या बाजूला असलेल्या नागराज फूलवाला यांचे दुकान संपूर्ण जळून खाक झाले आहे.

- Advertisement -

आगीचे कारण अस्पष्ट

तात्काळ आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती. त्यानंतर लाखनी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवण्यात जवानांना यश आले. या दुर्घटनेमध्ये दोन्ही दुकांनाचे लाखोंचे नुकसान झाले आहे, तर आगीचे कारण, अस्पष्ट असले तरी मात्र शार्ट सर्किटने आग लागली असल्याचे सांगितले जात आहे.


Live Update: मराठा आरक्षण प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -