घरक्रीडाAsian Games 2018 : भारतीय महिला कबड्डी संघाची इंडोनेशियावर मात

Asian Games 2018 : भारतीय महिला कबड्डी संघाची इंडोनेशियावर मात

Subscribe

एशियन्स गेम्स २०१८ मध्ये भारताच्या महिला कबड्डी संघाने विजयी घौडदौड सुरूच ठेवत श्रीलंके पाठोपाठ इंडोनेशियावरही विजय मिळवला आहे.

इंडोनेशियात सुरू असलेल्या Asian Games 2018 मध्ये भारताची कामगिरी आतापर्यंत चांगली सुरू आहे. भारताने आतापर्यंत तीन सुवर्णपदकं मिळवली आहेत. त्याच सोबत सांघिक खेळातही भारताची कामगिरी चांगली दिसून येत असून भारताच्या महिला कबड्डी संघाने इंडोनेशियावर ५४-२२ अशा फरकाने विजय मिळवला आहे. याआधीच्या सामन्यात भारतीय महिलांनी श्रीलंकेवरही ३८-१२ च्या फरकाने विजय मिळवला आहे. मात्र भारताच्या पुरूष संघाला काही खास कामगिरी करता आली नसून दक्षिण कोरियाविरूद्ध पराभवाला सामोरं जाव लागला आहे.

Asian Games 2018 : महिला कबड्डी संघाची विजयी घौडदौड सुरूच

- Advertisement -

वाचा – Asian Games 2018 : भारतीय कबड्डी संघ पराभूत

भारत इंडोनेशियाविरूद्ध सरस

भारताचा राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकीच्या सामन्यात भारताच्या पुरूष संघाने इंडोनेशियाला त्यांच्या होमग्राउंडवर १७-० च्या मोठ्या फरकाने पराभूत केल्यानंतर आथा भारताच्या महिला कबड्डी संघानेही इंडोनेशियाला त्यांच्या होमग्राउंडवर ५४-२२ अशा फरकाने नमवले आहे. सामन्याच्या सुरूवातीपासूनच भारताने सामन्यात आपला दबदबा कायम ठेवला होता. भारताकडून पहिल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या सोनाली शिंगटे, पायल चौधरी, साक्षी कुमार यांनी इंडोनेशियाविरूद्धही चांगली कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला.

वाचा – Asian Games 2018 : महिला कबड्डी संघाची विजयी सलामी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -