घरIPL 2020IND vs AUS : विराट कोहली नसल्याने भारताचे नुकसान - मायकल वॉन

IND vs AUS : विराट कोहली नसल्याने भारताचे नुकसान – मायकल वॉन

Subscribe

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

आगामी कसोटी मालिकेत मायदेशात खेळणारा ऑस्ट्रेलियाचा संघ भारताला अगदी सहजपणे पराभूत करेल, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने व्यक्त केले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम संघ मानले जातात. तसेच मागील वर्षी भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे यंदाच्या कसोटी मालिकेची चाहते, तसेच दोन्ही संघांचे खेळाडू आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. त्याचे हे पहिलेच अपत्य असणार आहे. त्यामुळे त्याने घेतलेला निर्णय योग्यच आहे. मात्र, कोहली नसल्याने भारताचे नुकसान होईल आणि ऑस्ट्रेलिया अगदी सहजपणे ही मालिका जिंकेल,’ असे मायकल वॉनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले.

- Advertisement -

 भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. कर्णधार कोहली एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतील सर्व सामने खेळणार आहे. मात्र, कसोटी मालिकेतील अखेरच्या तीन सामन्यांत तो खेळू शकणार नाही. कोहली पितृत्व रजेवर जाणार असून पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. विराट आणि पत्नी अनुष्का शर्मा या दाम्पत्याला जानेवारी २०२१ मध्ये अपत्यप्राप्ती होणार आहे. कोहली सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. त्यामुळे त्याची उणीव ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला नक्कीच भासेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -