घरताज्या घडामोडीसमृद्धी महामार्गाला १ मे २०२१ पासून सुरूवात

समृद्धी महामार्गाला १ मे २०२१ पासून सुरूवात

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

समृद्धी महामार्गाचे पॅकेज १० प्रकल्प
प्रकल्पाची धावपट्टी – ५७.९० कि.मी.
नियोजनात सर्व्हिस रोड, छोटे-मोठे पूल
भागातील वन्यजीवांना जाण्यासाठी रस्ता
मनुष्यबळ निर्मितीवर दिला जाणारा भर

राज्य सरकारचा बहुद्देशीय प्रकल्प समजल्या जाणार्‍या स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग १ मे २०२२ या दिवशी राष्ट्राला अर्पण करण्याची महत्वाची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे. या प्रकल्पाच्या दोन ठिकाणच्या कामांना भेट दिल्यावर प्रगतीचा आढावा घेत उध्दव ठाकरे यांनी ही घोषणा केली. समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

- Advertisement -

अमरावती येथे कामाच्या प्रत्यक्ष ठिकाणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट दिल्यावर सुरू असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. या महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी अधिकार्‍यांशी बोलताना दिली. चांगल्या दर्जाचे काम होत असल्याची पावती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. येत्या १ मे २०२१ पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. त्याआधीचा शिर्डी ते मुंबईपर्यंतचा मार्ग १ मे २०२२ पर्यंत सुरु होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अमरावतीनंतर मुख्यमंत्री ठाकरे हेलिकॉप्टरने औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले.

हा महामार्ग मुंबई ते नागपूरदरम्यानच्या १२ जिल्ह्यांतून जातो. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या महामार्गाचे नाव स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नामकरण करण्यात आले. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. त्याआधी त्यांनी या प्रकल्पाच्या कामाचा आढावा अधिकार्‍यांच्या बैठकीत घेतला होता. कोरोना काळात लॉकडाऊनवेळी कामात खंड पडेल, असे वाटत होते. पण त्या काळातही प्रकल्पाचे काम आज आहे त्याच गतीने सुरू होते, असे उध्दव म्हणाले. ज्या गतीने काम सुरू आहे, ते पाहता येत्या १ मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या महामार्गाचा काही टप्पा येत्या एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याची चाचपणी मुख्यमंत्र्यांनी केली.

- Advertisement -

शिर्डी-नागपूर मार्ग महाराष्ट्रदिनी
बहुद्देशीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या कामातील प्रगतीचा आढावा घेताना पूर्ण महामार्ग १ मे २०२२ या दिवशी सुरू होणार असला तरी या महामार्गाला पुढील वर्षी महाराष्ट्रदिनी मुहूर्त मिळेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. नागपूर ते शिर्डी दरम्यानचा महामार्ग या दिवशी सुरू होईल.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. समृद्धी महामार्गाची कामे लॉकडाऊन काळातही सुरू होती. त्यामुळे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा हा प्रकल्प आहे. हा महामार्ग देशातील सर्वोत्कृष्ट मार्ग ठरेल. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीपर्यंत येत्या १ मेपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. त्यानंतर पुढील वर्षात संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतूक मुंबईपर्यंत सुरळीत होईल.
– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -